27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषबेंगळुरूत पाण्याची भीषण टंचाई

बेंगळुरूत पाण्याची भीषण टंचाई

पाण्यासाठी लांबच लांब रांगा

Google News Follow

Related

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू शहरात सध्या पाण्याची भीषण टंचाई भेडसावत आहे. शहरातील सर्व बोअरवेल सुकल्या असून लोकांना पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच टँकरमाफियांनीही पाण्याचे दर वाढवल्यामुळे बेंगळुरूवासींच्या हालात भरच पडली आहे.

बेंगळुरूतील आरआर नगर येथील रहिवाशांना पाण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. ‘आरआर नगरमधील पट्टनगरी येथे पाणीटंचाई आहे. आमच्याशी बोलायलाही प्रशासनाला वेळ नाही. आम्ही एक भांडे पाणी अधिक मागितले तर, आम्हाला परत पाठवले जाते,’ असे एका रहिवाशाने सांगितले. ‘ते आमच्यासोबत आमच्या मुलांनाही येऊ देत नाहीत. ते विचारतात, हे मूल कोणाचे आहे? जर आम्ही आमचे मूल असल्याचे सांगितले तर त्यांना परत पाठवले जाते,’ असे एका महिलेने सांगितले.

चिक्कलप्पा यांच्या कुटुंबात सहा जण राहतात. त्यामुळे त्यांना पाणी पुरत नसल्याने त्यांना कसेबसे हे पाणी पुरवण्याची वेळ आली आहे. ‘मी ७१ वर्षांची आहे आणि मला रांगेत उभे राहावे लागत आहे. मुलांना शाळेत पाठवण्याआधी मला पाणी मिळणे गरजेचे आहे,’ असे त्या म्हणाल्या. तर, दुसऱ्या एका रहिवाशाने सांगितले की, त्यांच्याकडे आंघोळीसाठी, गाईंना पिण्यासाठी पाणीच शिल्लक नाही. आम्हा पाच जणांसाठी आमच्याकडे केवळ एकच भांडे पाणी आहे. ते पुरेसे नाही. ‘स्वयंपाकासाठी आम्ही पालिकेचे पाणी वापरतो. ते तेच पाणी फिल्टर करून पिण्यासाठी वापरतो,’ असे त्याने सांगितले.

हे ही वाचा :

‘राजकीयदृष्ट्या पक्षपाती निर्णय कधीच दिला नाही’

ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी अरविंद केजरीवालांना न्यायालयाकडून समन्स

पंतप्रधानांची दक्षिण मोहीम; भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता

हा कसला राजा हा तर भिकारी!

‘गेल्या तीन महिन्यांपासून येथे पाण्याची टंचाई आहे. दररोज आम्ही बंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिःसारण मंडळाच्या इंजिनीअरला फोन करतो. परंतु काहीही फरक पडलेला नाही. मी दररोज पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्रकल्पात येते. तिथे एका व्यक्तीला केवळ एकच भांडी पाणी दिले जाते. आम्हाला येथे तासन् तास उभे राहावे लागते, असे दिव्या हिने सांगितले. दिव्या हिने खासगी टँकरमाफियांच्या लुटीकडेही लक्ष वेधले. ते आधी प्रति कॅन ६०० ते एक हजार रुपये आकारत होते आता ते दोन हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे आकारत आहेत, असे दावा केला. सरकारने खासगी टँकरना त्यांचे दर कमी करण्याचे आदेश दिले, तेव्हा त्यांनी या परिसरात येणेच बंद केल्याचेही दिव्या यांनी सांगितले. ‘मी दररोज सरकारला ईमेल पाठवते आहे, परंतु कोणीही उत्तर देत नाही,’ असे दिव्या सांगतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा