32 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरविशेषमुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस

मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस

Google News Follow

Related

ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ९ मीटरच्या ५० इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली आहे. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्टवर अतिरिक्त ५० इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचा आदेश आहे. या ५० इलेक्ट्रिक बसेस १२ महिन्यांच्या कालावधीत दिल्या जातील. कंपनी कराराच्या कालावधीत या बसेसची देखभाल देखील करेल.

या नवीन आदेशासह, ऑलेक्ट्राकडे एकूण १३५० इलेक्ट्रिक बसेसच्या ऑर्डर आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे एमडी के. व्ही. प्रदीप म्हणाले की, “त्यांना गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ५० इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे”. या नवीन ऑर्डरमुळे, आमच्या ऑर्डर बुकचा आकडा सुमारे १३५० बसेसपर्यंत पोहोचला आहे. आम्ही आधीच सुरतमध्ये बस चालवत आहोत. या नव्या आदेशामुळे आता गुजरात राज्यात त्यांच्या २५० इलेक्ट्रिक बसेस असतील.

एकीकडे मुंबईसारख्या देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत बस प्रवासात लोकांचा मृत्यू होत आहे. मुंबईत बसेसच्या अभावामुळे राज्यातील इतर एसटी बसेससुद्धा मुंबईत चालवाव्या लागल्या होत्या. तर दुसरीकडे गुजरातमध्ये इलेक्टिक बसेसच्या खरेदीपर्यंत तेथील राज्य सरकार पोहोचले आहे.

या ९ मीटर एसी बसमध्ये प्रवासी आरामात प्रवास करू शकतो. यात इलेक्ट्रॉनिक नियंत्रित एअर सस्पेंशनसह ३३ अधिक एक ड्रायव्हर अशी आसन क्षमता आहे. प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बसेस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत. यात एक इमरजन्सी बटण, एक यूएसबी सॉकेट आहे. बसमध्ये बसवलेली लिथियम-आयन (ली-आयन) बॅटरी ट्रॅफिक आणि प्रवासी भार (बसमधील एकूण वजन) परिस्थितीनुसार बसला १८०-२०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्यास सक्षम करते. म्हणजेच सिंगल चार्जवर ही बस १८० ते २०० किलोमीटपर्यंत धावेल.

हे ही वाचा:

‘एवढी’ संपत्ती घेऊन घनी पळाले

राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे

अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची लवकरच होणार सुटका

अफगाणिस्तान प्रश्नावर काय म्हणाले जो बायडन? वाचा सविस्तर

इलेक्ट्रिक बसमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे. तसेच हाय-पॉवर एसी चार्जिंग सिस्टीम या बॅटरीला ३-४ तासांच्या आत पूर्णपणे रिचार्ज करण्यास सक्षम करते. आरामदायक प्रवास सुनिश्चित करण्यासाठी त्याला इलेक्ट्रॉनिक कंट्रोल एयर सस्पेंशन देण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा