…आणि काश्मीरच्या तलावात सुरू झाले फ्लोटिंग एटीएम

…आणि काश्मीरच्या तलावात सुरू झाले फ्लोटिंग एटीएम

जम्मू-काश्मीर हे राज्य कायमच भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक राहिले आहे. जम्मू-कश्मीर राज्याची बहुतांशी अर्थव्यवस्था ही केवळ त्याच्यावर अवलंबून आहे. दरवर्षी भारतातील आणि परदेशातील हजारो नागरिक जम्मू काश्मीर मध्ये फिरायला जात असतात.

अशा या सर्व पर्यटकांची सोय बघण्यासाठी वेगवेगळे अभिनव उपक्रम कायमच राबवले जातात. टायचाच एक भाग म्हणजे आता पर्यटक आणि व्यावसायिक यांच्या सोयीसाठी काश्मीरमध्ये फ्लोटिंग एटीएम उभारण्यात आले आहे. काश्मीर मधील जगप्रसिद्ध अशा डल लेक मध्ये हे एटीएम उभारले गेले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत या मशीनची उभारणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

राणेंची अटक हा देशपातळीवरचा गेम?

बापरे! त्याने केला आरोग्याशी ६८४ कोटींचा खेळ

उद्धव ठाकरेंना भाजपा पाठवणार ७५ हजार पत्रं

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारत फक्त ७८

काश्मीर मधील डल लेक हा कायमच पर्यटकांचा आकर्षण बिंदू राहिला आहे. काश्मीर मध्ये येणारा पर्यटक हा या तलावाला भेट देतोच देतो. या जगप्रसिद्ध तलावातील हाऊस बोट मधील प्रवास हा कायमच पर्यटकांना सुखावणारा असतो. तर काश्मीरमधल्या अनेक लोकांचा रोजगार हा हाऊस बोटवर चालतो. अशा सर्व पर्यटक आणि व्यावसायिकांच्या सोयीसाठी एसबीआयने डल लेकच्या हाऊस बोट मध्येच एटीएम सेंटर मध्ये उभारले आहे.

एसबीआयच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून या संबंधीची माहिती देण्यात आली आहे. १६ ऑगस्ट रोजी या एटीएमचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. भारतातील हे पहिले फ्लोटिंग एटीएम नसून याआधी केरळमध्ये अशा प्रकारचे फ्लोटिंग एटीएम एसबीआय मार्फत सुरू करण्यात आले आहे.

Exit mobile version