निवडणूक रोख्यांची माहिती मंगळवारी देण्याचे एसबीआयला निर्देश

वेळ वाढवून देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

निवडणूक रोख्यांची माहिती मंगळवारी देण्याचे एसबीआयला निर्देश

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक रोख्यांचा (Electoral Bonds) मुद्दा चर्चेत होता. अशातच निवडणूक रोखे प्रकरणी सर्वोच्च न्यायलयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला म्हणजेच एसबीआयला दणका दिला आहे. २४ तासांच्या आत म्हणजे उद्यापर्यंत निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती द्या, असे आदेश न्यायालयाने एसबीआयला दिले आहेत. निवडणूक रोखे तपशील प्रकरणी माहिती देण्यासाठी जूनपर्यंत वेळ देण्यात यावी अशी मागणी एसबीआयने केली होती. त्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने झालेल्या सुनावणीमध्ये हा अर्ज फेटाळून लावला आहे.

एसबीआयने २४ तासांच्या आत, म्हणजेच मंगळवार, १२ मार्चपर्यंत निवडणूक रोखे तपशील सादर करावेत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच आत्तापर्यंत काय केलं, असा सवाल देखील न्यायालयाने बँकेला विचारले आहे. १५ मार्चच्या संध्याकाळापर्यंत निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांची माहिती आपल्या वेबसाईटवर सादर करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूत रोख्यांसंदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ केली, तर कारवाई करण्यात येईल असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.

हे ही वाचा..

ऑस्ट्रेलियात भारतीय महिलेची हत्या, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला मृतदेह!

आचारसंहितेपूर्वी मंत्रालयात लगबग; पाच दिवसांत ७३० शासन निर्णय जारी

कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत; रस्त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

‘आयुष्मान’ योजनेचा ४८ टक्के महिलांकडून लाभ!

एसबीआयने ही माहिती देण्यासाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीला निर्णय देत निवडणूक रोखे योजना रद्द करण्याचे आदेश दिले होते. तसेच यासंदर्भातील रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला १३ मार्चपर्यंत जाहीर करण्यास सांगितलं होतं. सगळी माहिती गोपनीय पद्धतीने मुंबईमधील मुख्य शाखेला पाठवली जात असेल तर मग निवडणूक आयोगाला द्यायला अडचण काय? असा सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला. तसेच उद्यापर्यंत सर्व माहिती सादर करा असे आदेश दिले आहेत.

Exit mobile version