अयोध्येत होऊ घातली नवी मशीद ही वक्फ कायद्यानुसार बेकायदेशीर आहे असे मत मुस्लिम लॉ बोर्डचे सदस्य झफरयाब जिलानी यांनी व्यक्त केले आहे. वक्फ कायद्यानुसार मशीदीची जागा बदलता येत नाही. त्यामुळे ही मशीद वक्फ कायद्यानुसार बेकायदेशीर आहे आमी म्हणूनच ती शरियालाही मान्य नाही असा दावा जिलानी यांनी केला आहे.
अयोध्येची जागा राममंदिराचीच ह्यावर शिक्कामोर्तब करताना सर्वोच्च न्यायालयाने मशिदीसाठीही ५ एकर जागा सोडण्याचा निर्णय दिला. त्यानुसार अयोध्येतील धन्नीपुर गावी जागा देण्यात आली. काहीच दिवसापूर्वी या मशिदीचा आराखडा ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फौंडेशन’ तर्फे प्रसिद्ध करण्यात आला. सुन्नी वक्फ बोर्डने ‘इंडो-इस्लामिक कल्चरल फौंडेशन’ ची स्थापना अयोध्येतील मशीद बांधणीच्या कामासाठी केली.
या बोर्डचे सचिव अथर हुसेन यांच्या म्हणण्यानुसार,”शरियाचा अर्थ प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतो. जर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जमीन देण्यात आली आहे तर ती बेकायदेशीर असू शकत नाही.”