पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑक्टोबरला नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर देशातील 5G सेवेचा शुभारंभ केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी 5G सेवेचे फायदे सांगितले. तसेच स्वतःही त्यांनी हे तंत्रज्ञान समजून घेतले. पंतप्रधान मोदींनी 5G सेवेचा शुभारंभ केल्यानंतर राज्यासह देशभरात 5G सेवेला सुरुवात झाली आहे. 5G सेवेचा महाराष्ट्रात पहिला मान हा पनवेलमधील एका शाळेला मिळाला आहे.
महाराष्ट्रात शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रिलायन्स जिओ आणि एअरटेल हाय स्पीड 5G सेवेला सुरुवात झाली. या 5G सेवेचा पहिला मान महाराष्ट्रातील पनवेल पालिकेच्या पोदी येथील सावित्रीबाई फुले शाळेला मिळाला. या निमित्ताने पंतप्रधानांनी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्र. ८ या शाळेतील विद्यार्थ्यांशी दूरदृष्यप्रणाली द्वारे संवाद साधला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील 5G सेवेशी जोडलेल्या तीस शाळांसोबत एकत्रित संवाद साधला होता. शनिवारी सकाळी सावित्रीबाई फुले शाळेत मुख्यमंत्री शिंदे आणि विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींशी ऑनलाइन संवाद साधला.
हे ही वाचा:
‘उडता’ पंजाब, मुसेवाला हत्याकांडातील आरोपी फरार
धक्कादायक! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट
प्रतापराव जाधव म्हणाले, वाझे मातोश्रीवर १०० खोके नेत होता
फुटबॉल सामन्यादरम्यान राडा; १२७ मृत्युमुखी
मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी तंत्रज्ञानाबद्दल संवाद साधला. विद्यार्थ्यांना त्यांनी 5G चे महत्व सांगितले. 5G तंत्रज्ञानाने क्रांती होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्याचा फायदा सर्वाधिक शिक्षण क्षेत्राला होणार असून, विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इंटरनेटला मिळणाऱ्या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा. गेम आणि चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी नाही, असा सल्लाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला.