साहित्य संमेलनगीतात सावरकरांना स्थान का नाही?

साहित्य संमेलनगीतात सावरकरांना स्थान का नाही?

नाशिककरांनी, साहित्यप्रेमींनी उपस्थित केला प्रश्न

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ला भगूर, नाशिक येथे झाला असला तरी नाशिकला होत असलेल्या ९४व्या साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये मात्र सावरकरांचा उल्लेख नाही. अनेक साहित्यप्रेमींनी याबद्दल आश्चर्य आणि नाराजीही व्यक्त केली आहे.

अनंत आमुची ध्येयासक्त अक्षरशक्ती… अशा शब्दांनी हे गीत सुरू होते. मिलिंद गांधी यांनी हे गीत लिहिले असून त्याचे अनावरण पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. संजय गिते यांनी या गीताला संगीत दिले आहे. पण या गीतात १९३८च्या २३व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेल्या वि. दा. सावरकर यांचा उल्लेखही नाही. सावरकरांनी ५० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली. त्यात १८५७चे स्वातंत्र्यसमर, संगीत उत्तरक्रिया, काळे पाणी, गांधी आणि गोंधळ, जोसेफ मॅझिनी, महाकाव्य कमला, महाकाव्य गोमांतक, माझी जन्मठेप, मोपल्यांचे बंड, शत्रूच्या शिबिरात, संन्यस्त खड्ग, बोधिवृक्ष, सावरकरांच्या कविता अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

नाशिकमधील सर्व साहित्यिकांचा या गीतामध्ये उल्लेख आहे पण सावरकरांचा संदर्भच नाही. यासंदर्भात गीतकार गांधी म्हणाले की, मी सावरकरप्रेमी आहे. मला सावरकरांबद्दल आदर आहे. पण कविता व गाण्याचा अर्थ समजून घ्यावा. स्वातंत्र्याचे सूर्य असा उल्लेख त्यात आहे. तो एकट्या स्वातंत्र्यवीरांसाठी नाही तर त्यांच्या कुटुंबियांसाठी आहे. हे समजून घ्या.
याबाबत सावरकरप्रेमींनी मात्र हा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचे म्हटले आहे. ते केवळ हिंदुत्ववादी होते म्हणून त्यांचा उल्लेख टाळणे योग्य नाही. सावरकर अभ्यासक पार्थ बावस्कर यांनी म्हटले आहे की, या गीतात स्वातंत्र्यसूर्य असा उल्लेख असला तरी तो थेट सावरकरांशी संबंधित नाही. तिथे इतर साहित्यिकांची थेट नावे आहेत मग स्वातंत्र्यवीर, विनायका असा उल्लेख करता येणे शक्य होते. पण तो उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे.

 

हे ही वाचा:

ठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले

वरळी कोळीवाड्यात दोन बसमध्ये चिरडून तरुणीचा मृत्यू

कोका- कोला ‘थंड’ का झाला? महसुलात झाली मोठी घट

जनधन खाती वाढली आणि गुन्हे घटले!

 

बावस्कर म्हणाले की, साहित्य संमेलनातील एखाद्या व्यासपीठाला, एखाद्या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीरांचे नाव देणे सहज शक्य होते. पण केवळ ते हिंदुत्ववादी आहेत म्हणून त्यांचे नाव टाळण्यात आले आहे. या प्रकरणात नाशिक व भगूरच्या संस्थांनी सांगितले होते की, स्वातंत्र्यवीरांचे नाव संमेलनात द्या. प्रत्येकवेळेला साहित्य संमेलन वादविवादात अडकलेच पाहिजे का? कुठेतरी साहित्य मंडळांनी याचा विचार करावा. सावरकरांचे नाव दिल्यामुळे सावरकर मोठे होणार नाहीत की नाव न दिल्यामुळे लहान होणार नाहीत पण त्यांच्याबद्दल आदर दाखविण्याची गरज होती.

Exit mobile version