भारताचा स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर, सिक्रेट फाईल्स’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या सीरिजच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास उलगडला जाणार आहे.
‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या शूटिंगचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी या वेब सीरिजचे लेखक आणि दिग्दर्शक योगेश सोमण उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण जीवनावर हिंदी भाषेत ही सिरीज चार सीझनमध्ये असणार आहे. या वेबसिरीजमध्ये सावरकर यांच्या जन्मापासून म्हणजे १८८३ ते मार्सेलिस येथे समुद्रात उडी मारण्यापर्यंतचा कालखंड पाहता येणार आहे”.
सावरकरांचे जीवनकार्य आणि त्यांचा लढा संपूर्ण देशाला माहित व्हावा यासाठी हिंदी भाषेत ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आगामी वेबसीरिजसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
हे ही वाचा:
ललित पाटीलच्या दोन महिला साथीदारांना अटक
हॉस्पिटलमधील कर्मचारी, पोलिसांना मॅनेज करण्यासाठी ललित पाटील देत होता पैसे
थरूर केरळात रिमझिमले पण, महाराष्ट्रात ठाकरे का सुखावले?
पाकिस्तानकडून जम्मू सीमेवरील विक्रम चौकीवर गोळीबार; दोन जवान जखमी
‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या सिरीजचे दिग्दर्शक योगेश सोमण म्हणाले की, “सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासहित देशकार्यासाठी अर्पण केले. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासमोर आलेच पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देणे हे आमचे नॅरेटिव्ह नसून या वेबसीरिजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे पुरावे तार्किक दृष्टीने मांडता येतील आणि त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व जसे होते तसे मांडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.” सिक्रेट फाईल्स म्हणजे सावरकरांचे व्यक्तिमत्व जे लोकांना माहित नाही ते अनफोल्ड करण्याचा प्रयत्न असणार आहे असंही ते म्हणाले. तसेच आजपर्यंत सावरकर यांच्यावर आधारित नाटक, चित्रपट आले परंतु, वेब सीरिजच्या माध्यमात प्रथमच ही सीरिज समोर येणार आहे.