वीर सावरकर यांचा २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांच्या दादर (पश्चिम) मुंबई येथील राहत्या घरात, सावरकर सदन येथे सकाळी ११.१० वाजता देहांत झाला. त्यांनी ३ फेब्रुवारी पासून आपल्या ८३ वर्षांचे नाट्यमय घटनांनी भरलेल्या आयुष्याचा शेवट करण्यासाठी उपोषणाला सुरूवात केली. डॉ.आर.व्ही साठे आणि डॉ. सुभाष पुरंदरे या त्यांच्या दोन्ही डॉक्टरांना देखील शेवटच्या काळात कोणतेही औषध न घेता आणि केवळ पाच-सहा चमचे पाणी यांच्या सहाय्याने त्यांची तब्येत संतुलित राहिली याचे आश्चर्य वाटले. त्यांचे चरित्रकार धनंजय कीर यांच्या मते ही त्यांच्या योग साधनेची शक्ती होती.
सावरकरांनी अंदमानात सेल्युलर जेलमध्ये असल्यापासून योग साधनेला सुरूवात केली. सावरकरांनी तयार केलेल्या हिंदुराष्ट्राच्या मुळ त्रिकोणी झेंड्यावर कुंडलिनी, तलवार आणि ओम होता. जेव्हा हिंदू महासभेने तो ध्वज स्विकारला तेव्हा त्यावर स्वस्तिकची भर घालण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पार्थिव सावरकर सदनाच्या तळमजल्यावर २६ फेब्रुवारीला दुपारी ४.३० वाजल्यापासून ते २७ फेब्रुवारीच्या दुपारी ३.३० पर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक लोकांनी सावरकरांना श्रद्धांजली वाहिली, ज्यात समाजातील सर्व स्तरातील माणसे तर होतीच शिवाय वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीची माणसे देखील आली. श्रेष्ठ चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांनी त्यांच्या अंत्ययात्रेचे केलेले चित्रण आजही उपलब्ध आहे. माझे गुरू आणि सावरकर अभ्यासक डॉ. हरिंद्र श्रीवास्तव यांनी या कृष्णधवल चित्रफितीचा शोध घेतला होता.
इतक्या बहुआयामी आयुष्याचा शेवट करण्यासाठी आत्मार्पणाशिवाय दुसरा कोणता चांगला मार्ग असू शकतो? कर्नाटकातील श्रवणबेळगोळ या ठिकाणी इ.स.पू. २९८ मध्ये आपल्या आयुष्याच्या शेवटी जैन धर्मातील संथाराची साधना करणाऱ्या, भारताचा पहिला चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य याच्यापासून सावरकरांनी प्रेरणा घेतली असेल का? याबाबत खात्रीलायकरित्या काही सांगणे अवघड आहे. परंतु चंद्रगुप्त मौर्य हा सावरकरांचा आवडता नायक राहिला आहे. त्याने अनेक छोट्या छोट्या राज्यांमधून आणि जनपदांमधून एका मोठ्या साम्राज्याची स्थापना केली. त्यामुळे जेव्हा अलेक्झँडरचा सेनापती सेल्युकस १ निकेटर याने भारतावर स्वारी केली तेव्हा त्याचे हात पोळले. चंद्रगुप्ताच्या अधिपत्याखाली एकवटलेल्या सैन्याला पाहून त्याला धक्का बसला होता. आपल्या कन्येचा चंद्रगुप्ताशी विवाह करून देऊन, त्याला मैत्रीचा तह करावा लागला.
सावरकरांच्या ‘भारतीय इतिहासातील सहा सोनेही पाने’ या शेवटच्या पुस्तकात चंद्रगुप्ताला त्याचा नातू सम्राट अशोकापेक्षा श्रेष्ठ राजा मानले आहे. चंद्रगुप्त हा लढायांत अजेय होता, प्रशासानात कुशल होता आणि त्यागात अजोड होता. त्याला मिळालेला भारत हा अनेक राज्यांत विभागलेला होता. आपले गुरू चाणक्य (कौटिल्य) याच्या मार्गदर्शनाखाली, त्याचे त्याने एका सक्षम राष्ट्रांत रुपांतर केले. दुसऱ्या बाजूला सम्राट अशोकाने बौद्ध धर्मातील शांतता आणि अहिंसेचा मार्ग अनुसरल्यानंतरही सत्तेवर राहणे पसंत केले होते. त्याच्यामुळे भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आले. बॅक्ट्रियामधून (अफगाणिस्तान) आलेल्या दुसऱ्या ग्रीक आक्रमकांच्या लाटेत भारत त्यांनी जिंकला.
सावरकरांनी त्यांच्या सडेतोड युक्तिवादाने अशोकाची सर्वोत्कृष्ट राजा म्हणून असलेली प्रतिमा हलवून टाकली. अशोकापेक्षा त्याचे आजोबा चंद्रगुप्त हा श्रेष्ठ होता असे त्यांचे मत होते. अशोकाचे प्रशंसक असलेल्या जवाहरलाल नेहरूंना आपल्या चीनसोबतच्या शांततामय धोरणाची चांगलीच किंमत चुकवावी लागली होती. सावरकरांनी २६ जानेवारी १९५४ रोजी केसरी या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नेहरूंच्या जागतिक शांततेच्या धोरणावर टिका केली होती, ज्यामुळे चीनने तिबेटवर आपला हक्क प्रस्थापित केला. सावरकरांनी चीनकडून होणाऱ्या आक्रमणाच्या धोक्याची पूर्वकल्पना दिली होती (जी दुर्दैवाने १९६२ सालीच त्यांच्या हयातीत सत्यात उतरली). चंद्रगुप्त आणि अशोकाच्या कथेचा धडा भारतातच विसरला गेला होता. सावरकरांनी कायमच म्हटले की कोणताही देश लष्करी ताकदीशिवाय मोठा होऊ शकत नाही. एवढीच इच्छा की, भारताने सावरकरांचे म्हणणे वेळेत ऐकायला हवे होते.