भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे वृत्त आहे. सौरव गांगुली यांना सध्या कोलकाता येथील वुडलँडस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. सौरव गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. सौरव गांगुलीच्या कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने ‘एबीपी’ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
सौरव गांगुली यांची रात्री उशिरा कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोलकातामधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सौरव गांगुली यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे. सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंध लसीचे दोन्ही डोस घेऊनही सौरव गांगुली याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.
हे ही वाचा:
लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाईंडला अटक
दिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रा यांनी दिली ‘ही’ ऑफर
रायगड: महिला सरपंचाचा खून! विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह
अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणेंची कोर्टात धाव
सौरव गांगुली यांना यापूर्वीही गेल्या वर्षी ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर गांगुली यांना वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल केले गेले होते. गांगुलींवर त्यावेळी महिनाभरात दोन अँजियोप्लास्टी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सौरव गांगुली यांनी त्यांच्या कामाला पुन्हा सुरुवात केली होती.