भारतीय क्रिकेट संघातील वाद सध्या समोर आले असून विराट कोहली आणि सौरव गांगुली यांनी केलेल्या विधानांमुळे आता दोघांपैकी खरे कोण बोलत आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की, टी- २० चे कर्णधारपद सोडू नये यासाठी कोणाचाही फोन आला नव्हता. मात्र, सौरव गांगुलीने आपण स्वत: विराट कोहलीला फोन करुन टी- २० चे कर्णधारपद सोडू नये यासाठी विनंती केली होती असे सांगितले होते. यामुळे वाद असल्याचे चित्र आणखी स्पष्ट झाले आहे. यादरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपण विराट कोहलीचे खूप मोठे चाहते आहोत असे म्हटले आहे.
दरम्यान गुडगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात सौरव गांगुली यांना कोणत्या खेळाडूची वृत्ती सर्वात जास्त आवडते असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना सौरव गांगुली यांनी विराटचे नाव घेत म्हटले की, “आपल्याला विराट कोहलीची वृत्ती आवडते, पण तो खूप भांडतो”. याच कार्यक्रमात सौरव गांगुली यांना आयुष्यात येणाऱ्या तणावाला कसे हाताळायचे याबद्दलही विचारण्यात आले. यावेळी गांगुली यांनी मजेशीर उत्तर देत म्हटले की, “आयुष्यात तणाव नसतोच. फक्त बायको आणि प्रेयसी तणाव देते”.
रोहित शर्माकडे वनडे आणि टी- २० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यापूर्वी विराटला टी- २० कर्णधारपद सोडण्याविषयी फेरविचार करण्याची विनंती केली होती. पण त्याने प्रतिसाद न दिल्यामुळे आणि मर्यादित षटकांसाठी दोन कर्णधार नकोत म्हणून रोहितला कर्णधार केले, असे विधान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केले होते.
हे ही वाचा:
धावत्या रेल्वेमध्ये पढला जातोय नमाज
‘सरसेनापती हंबीरराव’ चा खतरनाक टीजर
श्रीनगरमध्ये लष्कर- ए- तोयबाचा दहशतवादी ठार
आमदार अतुल भातखळकरांचे उद्धव ठाकरेंना तीन सवाल! मुख्यमंत्री देणार का उत्तर?
मात्र, त्यानंतर पत्रकार परिषदेत विराट याने खुलासा केला की, “टी- २० संघाचे कर्णधारपद सोडू नये यासाठी माझ्यासोबत कोणताही संपर्क साधण्यात आला नाही. साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची निवड करण्यात आली तेव्हा या निवडीसाठी ९० मिनिटे शिल्लक असतानाच मला कर्णधारपदावरून वगळण्यात आल्याचे समजले. बीसीसीआयने एकदाही याबाबत माझ्याशी संवाद साधला नाही. त्यावेळी त्यांचा निर्णय मान्य करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता,” असे विराटने सांगितले. त्यामुळे आता या वादात नक्की कोण खरे बोलत आहे हा प्रश्न उपस्थित झाला आहे.