सौदी अरेबियाने काश्मीरबाबत भारताच्या भूमिकेचे केले समर्थन!

सौदी अरेबियाने काश्मीरबाबत भारताच्या भूमिकेचे केले समर्थन!

सौदी अरेबिया आणि पाकिस्तानने जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील प्रलंबित समस्या, विशेषत: जम्मू आणि काश्मीर वाद सोडवण्यासाठी द्विपक्षीय चर्चेच्या महत्त्वावर भर देण्यात आला. त्यामुळे पाकिस्तानसोबत स्वाक्षरी केलेल्या या संयुक्त निवेदनात जम्मू आणि काश्मीरबाबत भारताच्या भूमिकेचे समर्थन करून दोन्ही देशांना त्यांचे प्रश्न द्विपक्षीयपणे सोडविण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि सौदीचे राजे मोहम्मद बिन सलमान यांच्या भेटीच्या एका दिवसानंतर हे संयुक्त निवेदन जाहीर करण्यात आले आहे. मक्का येथील अल-सफा पॅलेस येथे ७ एप्रिल रोजी अधिकृत बैठक झाली. त्यावेळी दोन्ही बाजूंनी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही देशांमधील प्रलंबित समस्या, विशेषत: जम्मू आणि काश्मीर वाद सोडवण्यासाठी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संवादाच्या महत्त्वावर भर दिला, असे निवेदन देण्यात आले.

काश्मीरचा प्रश्न हा द्विपक्षीय मुद्दा असून कोणत्याही त्रयस्थ पक्षाच्या मध्यस्थीचा किंवा हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही, ही भारताची दीर्घकाळापासूनची भूमिका आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे सौदी अरेबियासह अरब देशांशी दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंधांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.

हे ही वाचा:

‘सरकारने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मणिपूरची परिस्थिती सुधारली’

एलन मस्क यांनी टाकले मार्क झुकेरबर्गला मागे!

‘अनिल मसिह यांना विचारू, असे का केले?’

हिंदू नववर्षाचा राज्यात उत्साह! शोभा यात्रांचे आयोजन

सौदी अरेबियाने जम्मू आणि काश्मीरबाबत संतुलित दृष्टिकोन ठेवला आहे. सौदी अरेबियाने ऑगस्ट २०१९ मध्ये भारताने कलम ३७० रद्द केल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती, परंतु या कृतीचा स्पष्टपणे निषेध केला नाही, त्याऐवजी तो भारताचा अंतर्गत मामला आहे, असे म्हटले होते. सन २०१९मध्ये, पाकिस्तानने काश्मीर प्रश्नाचे शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी भारताचे मन वळवण्याची विनंती अमेरिकेला विनंती केली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर दोन्ही राष्ट्रांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले होते. तथापि, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट केले होते की, या मुद्द्यावर कोणतीही चर्चा जर आवश्यक असेल तर ती केवळ पाकिस्तानशीच होईल आणि केवळ द्विपक्षीय. जम्मू आणि काश्मीर हा देशाचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील, असे भारताने पाकिस्तानला वारंवार सांगितले आहे.

Exit mobile version