सत्यजीत तांबे यांनी नाना पटोलेंचे उघडे पाडले पितळ; चुकीचे एबी फॉर्म दिले

भारत जोडोचा संदेश देता पण आपल्याच लोकांना पायात पाय घालून पाडता

सत्यजीत तांबे यांनी नाना पटोलेंचे उघडे पाडले पितळ; चुकीचे एबी फॉर्म दिले

काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पितळच उघडे पाडले. आपल्याला कसे अंतर्गत राजकारणाचा बळी ठरविण्यात आले आणि जाणीवपूर्वक आपल्याला मदत न करण्याचे धोरण काँग्रेसने राबविले याचा पाढाच सत्यजीत यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविला.

सत्यजीत तांबे म्हणाले की, आम्ही पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन राजकारण केले. एक वर्षपूर्वी एचके. पाटील यांना भेटलो की, तुम्ही काहीतरी संधी द्या. मी आमदार, खासदार पदांमध्ये विश्वास ठेवणारा नाही. लिहून घ्या पण संधी तर द्या. पण दुर्दैवाने तसे काही झाले नाही. तुमच्या वडिलांच्या जागेवर विधानसभेची निवडणूक लढा. असे मला सांगण्यात आले. त्यादरम्यानच पदवीधर निवडणूक आली. पुस्तकाचे प्रकाशन होते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात आदित्य ठाकरे यांना बोलावले. शहर विकास हा राजकारणाच्या पलिकडे जाऊन काम केले पाहिजे, ही भावना त्यामागे होती.

तेव्हा फडणवीस म्हणाले की, सत्यजीतला संधी द्या नाहीतर त्याच्यावर आमचा डोळा आहे. त्यातून चर्चा सुरू झाली. देवेंद्रजींचे संबंध जवळचे आहे मोठ्या भावासारखे मानतो. राजीव राजळे २००४मध्ये आमदार झाले तेव्हा तरुण आमदारांत देवेंद्र फडणवीस होते, असेही सत्यजीत म्हणाले.

त्यानंतर निवडणुकीच्या एचके पाटील यांच्याशी चर्चा झाली. तेव्हा ते म्हणाले की, शेवटच्या क्षणाला निर्णय घेऊ. एबी फॉर्म पाठवू तेव्हा कोण लढवणार तुम्ही ठरवा. शेवटचा दिवस आला अर्ज भरण्याचा तेव्हा एचके. पाटील यांच्याशी चर्चा झाली. २ दिवस आधी ९ जानेवारीला एबी फॉर्म पाहिजे म्हणून आम्ही प्रदेश कार्यालयाला संपर्क साधला. ते म्हणाले की, नागपूरला माणूस पाठवा. १० तारखेला माणूस पोहोचला. १० जानेवारीला संध्याकाळी ७ पर्यंत बसला १० तास बसून राहिला शेवटी नानाभाऊ पटोले यांनी अमूक व्यक्तींच्या हाती देत आहोत फॉर्म असे आम्हाला सांगितले. ते विधानपरिषदेचे फॉर्म असल्यामुळे सीलबंद होते. ११ तारखेला सकाळी पोहोचला. फॉर्म भरायला सुरुवात केली. पाकीट फोडले दोन कोरे फॉर्म हे चुकीचे आहेत हे नाशिक पदवीधर संघाचे नाहीत, अशी धक्कादायक माहिती हाती आली. औरंगाबाद आणि नागपूर शिक्षक मतदार संघाचे फॉर्म, असे सत्यजीत यांनी सांगत सगळा घटनाक्रम सांगितला.

हे ही वाचा:

…हे म्हणजे आपल्या गल्लीत वाघ ठरण्यासारखे!

गोड वाणी झाली निशब्द… गायिका वाणी जयराम यांचे निधन

कसबा, चिंचवडसाठी भाजपाची घोषणा; रासने, अश्विनी जगताप उमेदवार

मध्य रेल्वे मार्गावर रविवार ५ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ…

ते पुढे म्हणाले की, इतका हा संवेदनशील मुद्दा त्यांनी का गंभीरपणे घेतला नाही. जर मला निवडणूक भाजपातून लढायची होती, अपक्ष लढायची होती तर मी प्रदेश कार्यालयाला कळवले नसते. आम्ही ११ तारखेला कळवले. चुकीचे फॉर्म १२ तारखेला दुपारी २ वाजता आले. सुधीर तांबेंचे नाव असलेले. यावर अभा काँग्रेस त्यावर काय कारवाई करणार होती. आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक षडयंत्र रचले गेले. स्क्रीप्ट तयार होती माझ्या माणसाला १०-१२ तास बसवून ठेवले. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असे आम्हाला सांगितले मग १२.३० वाजता दिल्लीतून माझ्या वडिलांची उमेदवारी का जाहीर केली? वडील माझ्याबद्दल आग्रही होते. महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराची दिल्लीतून उमेदवारी जाहीर झाली नाही फक्त माझीच झाली, ते का?

मी अर्ज काँग्रेसच्या नावानेच भरला होता. पण एबी फॉर्म न जोडल्याने तो अपक्ष ठरला. पण त्याची शहानिशा न करता फॉर्म अपक्ष भरला अशी भूमिका मांडली. मी स्पष्ट सांगितलं. मी काँग्रेसचा उमेदवार आहे. आम्ही महाविकास आघाडीचे आहोत. पण भाजपाचा पाठिंबा घेणार त्यातून राजकारण झालं. स्क्रीप्टची तयार झाली भाजपात ढकलण्याचं काम झालं. हे अर्धसत्य सांगतो आहे. तरीही ते थांबलं नाही. मी साडेतीन वाजता बाहेर आल्यावर एच के पाटील यांचा फोन आला. मी सांगितलं. पांठिबं जाहीर करा. १६ तारखेला माघार आहे महाविकास आघाडीतील संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. पवारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, अजित दादांशी भेट घेण्याचा प्रयत्न केला, सुप्रिया सुळेंनाही सांगितलं. मविआने पाठिंबा द्यावा यासाठी दिल्लीशी संपर्कात होतो. तेव्हा मला दिल्लीतून सांगितलं की पत्र लिहा काँग्रेसचा पाठिंबा मागा. मी पत्र पाठवलं. पत्रात काही बदल करायला सांगितलं. जाहीर माफी मागावी असेही सांगितले. तेव्हा यात माझी चूक नाही असे सांगितले. तेव्हा तरीही माफी मागा असे म्हणाले. मी तयारही झालो. एचके पाटलांना पत्र दिलं. १९ तारखेला पाठवलं. तीन दिवस बोलत होतो. थोरात पटोले यांचे बोलणे झाले होते. नानांना मी फोनही केला. नानाभाऊ हे सोडा मला पाठिंबा द्या. पण  प्रदेशाध्यक्ष तांबेंनी आम्हाला फसवलं धोका दिला असे सांगत होते. एकीकडे भारत जोडो म्हणतात, या राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी द्वेषापोटी परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतूपूर्वक प्रकार केला. यात खासगी बैठकात ज्या पद्धतीने बोलले ते माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. पण आता मी यावर बोलणार नाही. रेकॉर्डिंग ऐकले तर द्वेष किती ते कळेल. फडणवीसांनी राष्ट्रवादीने काँग्रेसचे १०० टक्के लोक होते. हात जोडण्याची मोहीम एकीकडे राबवतात पण पायात पाय घालून पाडतात, असा शेराही सत्यजीत तांबे यांनी मारला.

Exit mobile version