सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळावर चार स्वतंत्र संचालकांची पुनर्नियुक्ती केली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत एस गुरुमूर्ती आणि सहकार चळवळीचे ज्येष्ठ नेते सतीश के मराठे यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने सतीश काशिनाथ मराठे, स्वामीनाथन गुरुमूर्ती, रेवती अय्यर आणि सचिन चतुर्वेदी यांची पुढील चार वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळावर अर्धवेळ, अशासकीय संचालक म्हणून पुन्हा नियुक्ती केली आहे.
मराठे आणि गुरुमूर्ती यांची पुनर्नियुक्ती ११ ऑगस्टपासून किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल ते लागू होईल या नुसार असेल. अय्यर आणि चतुर्वेदी यांची पुनर्नियुक्ती त्यांचा सध्याचा कार्यकाळ १८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण झाल्यानंतर किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल ते लागू होईल.
हे ही वाचा:
मुंबईकर म्हणतात राष्ट्रध्वजासोबतच काठीही द्या
आम्ही मुंबई व्हाया सूरत, गुवाहाटी मॅरेथॉन जिंकून आलोय
केजरीवाल सरकारने मला कोणतीही मदत केली नाही
कोणत्या रागातून पत्नीने केले पतीच्या शरीराचे तुकडे?
केंद्राने रेवती अय्यर यांची नॉर्दर्न लोकल बोर्डवर सदस्य म्हणून आणि सचिन चतुर्वेदी यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ईस्टर्न लोकल बोर्डावर सदस्य म्हणून१८ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचा सध्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुढील चार वर्षांसाठी पुन्हा नियुक्ती केली आहे. किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल असे रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे.