33 C
Mumbai
Monday, November 18, 2024
घरविशेषडॉ. सच्चिदानंद शेवडे यांची षष्ठ्यब्दीपू्र्ती आणि ५०व्या पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांची षष्ठ्यब्दीपू्र्ती आणि ५०व्या पुस्तकाचे प्रकाशन

Google News Follow

Related

डावी विषवल्ली या पुस्तकाबद्दल उत्सुकता

प्रसिद्ध निरुपणकार, नामवंत साहित्यिक, विचारवंत, प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले  आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डॉ. शेवडे यांचा हा सत्कार होणार असून त्यावेळी शेवडे यांनी लिहिलेल्या डावी विषवल्ली या त्यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे.

डावी विषवल्ली हे डॉ. शेवडे यांचे ५०वे पुस्तक असून त्याचवेळी शेवडे यांच्यावरील गौरव ग्रंथाचे प्रकाशनही केले जाणार आहे.

डोंबिवली (पू.) येथे टिळकनगर विद्यामंदिराच्या पटांगणावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पै फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै तसेच टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी कोविड लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी दहा मिनिटे आधी आसनस्थ व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

किशोर गट राष्ट्रीय खोखोत महाराष्ट्राला दुहेरी विजेतेपद

परदेशातून येणाऱ्यांना आता सात दिवस क्वारंटाइन

‘नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू’

पेपरफुटीतून विद्यार्थ्यांची पिळवणूक

 

डॉ. सच्चिदानंद यांचे वडील सु. ग. शेवडे हे विख्यात कीर्तनकार. त्यांचा वसा व्याख्यान, प्रवचनाच्या माध्यमातून डॉ. शेवडे यांनी प्रखरपणे पुढे नेला.

सध्या ते अपरिचित रामायण हा ग्रंथही लिहित असून त्यात रामायणातील अनेक शंकाकुशंकांना दूर करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे लेखन केले आहे. खऱ्या मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना समोर आणणारा असा हा ग्रंथ आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा