ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या फोटोची चौकशी करा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी मंत्री दादा भुसे यांनी फोन केला होता असा आरोप ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता.या प्रकरणी पुरावे असतील तर सादर करा, माझे कॉल रेकॉर्डस् तपासा अन्यथा मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा मंत्री दादा भुसे यांनी सुषमा अंधारेंना दिला होता.आता ड्रग्ज माफिया ललित पाटील सोबत उद्धव ठाकरे यांचा फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले असून शिंदे-ठाकरे गटांकडून आरोप प्रत्यारोप सुरु झालं आहे.
ललित पाटील याच्या सोबत उद्धव ठाकरेंचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या फोटोची चौकशी करा, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. तर दुसरीकडे फोटोत दिसणारे दादा भुसे यांनीच ललित पाटीलला मातोश्रीवर आणलं होतं, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. ललित पाटील फरार प्रकरणात आता राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे.
हे ही वाचा:
तुमच्या पुरुषार्थामुळे पदकांची प्रतीक्षा संपली!
इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला आठवला मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला
शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल
महायुती सरकारचा समित्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला
शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी या फोटोची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुषमा अंधारेंनी हे फोटो बघावे आणि त्यांनी या संदर्भात आमच्या पालकमंत्र्यांवर चुकीचे आरोप करु नये. असे आरोप करण्याचा अंधारेंकडे कोणताही अधिकार नाही. या फोटोत दिसणारे पदाधिकारी यांची चौकशी आधी करा आणि मग दादा भुसेंचं नाव घ्या. पदाधिकारी आणि बाकी कार्यकर्त्यांचे ललित पाटीलशी कोणते संबंध आहे. याची माहिती घेण्यासाठी अंधारेंनी पत्र द्यावं आणि त्यांची चौकशी करावी, असं ते म्हणाले आहे.
दरम्यान दोन्ही गटांकडून हा फोटो व्हायरल केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल झालेला फोटो हा २०१८ च्या दरम्यानचे आहेत.त्यावेळी ललित पाटील हा शिवसेनेत दाखल झाला होता. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीच्या प्रचार रॅलीतदेखील तो होता. या फोटोत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप दिसत आहेत आणि काही फोटोत उद्धव ठाकरे यांच्यासोबत दादा भुसेंच्या उपस्थित प्रवेश केला तेव्हाचे हे फोटो असल्याचं दिसत आहे.