मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्यात वातावरण तापले असताना परळीतील सरपंचाचा मृत्यू झाला आहे. औष्णिक केंद्राची राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवल्यामुळे सरपंचाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
अभिमन्यू क्षीरसागर असे मृत्यू झालेल्या सरपंचाचे नाव आहे. सौंदाणा गावचे ते सरपंच होते. परळी तालुक्यातील मिरवड फाट्यावर शनिवारी (११ जानेवारी) रात्री औष्णिक केंद्राची राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात सरपंच क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरदार होती की त्यांच्या दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.
औष्णिक केंद्रातील राखेतून कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचे नुकतेच समोर आले होते. भाजपा आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. यामध्ये वाल्मिक कराडसह मोठ्या व्यक्तींचा हात असल्याचे त्यांनी म्हटले होते. सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृत्यूवरही त्यांनी शंका उपस्थित केली आहे. हा अपघात कि अपघात असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा :
बहुप्रतीक्षित झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार !
निवडणुकीसाठी आपच्या मुख्यमंत्र्यांनी हात पसरले !
प्रशांत कुमार सिंग मणिपूरचे नवे मुख्य सचिव
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात एस जयशंकर उपस्थित राहणार