सर्फराज, ध्रुव जुरेलची कोटी उड्डाणे

बीसीसीआयच्या करारात समावेश, कसोटीतील कामगिरीची मिळाली भेट

सर्फराज, ध्रुव जुरेलची कोटी उड्डाणे

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने भारतीय संघाच्या दोन युवा खेळाडूंना मोठी भेट दिली आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणातच चमकदार कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंना इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) २०२४ पूर्वी आनंदाची बातमी मिळाली आहे. भारतीय क्रिकेटपटू सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांचा केंद्रीय करार मिळालेल्या खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या अपेक्स काऊन्सिलच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेची बैठक पार पडली असून सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना केंद्रीय करारामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्फराज आणि यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल यांना बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या श्रेणी सी मध्ये स्थान मिळाले आहे आणि त्यांचे वार्षिक रिटेनरशिप फी १ कोटी रुपये असणार आहे.

सर्फराज खान यावेळच्या आयपीएलमध्ये खेळणार नाही. आयपीएलच्या ऑक्शनमध्ये दहापैकी एकाही संघाने सर्फराज खानवर बोली लावली नव्हती. त्याची बेसप्राईज २० लाख रुपये इतकी होती. लवकरच तो आयपीएलमध्ये खेळेल अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. तर ध्रुव जुरेल हा राजस्थान रॉयल्स संघातून खेळताना दिसणार आहे. ध्रुवची बेसप्राईजही २० लाख रुपये आहे.

हे ही वाचा:

मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी वाद: सर्वोच्च न्यायालयाने मशीद समितीची याचिका फेटाळली

गुजरात विद्यापीठात हाणामारीचे कारण फक्त नमाज नाही…

शरियत कायदा-बहुविवाहच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार

मादी चित्ता गामिनीने पाच नव्हे सहा बछड्यांना दिला जन्म

नुकत्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पाच कसोटी सामन्यांची ही मालिका भारताने ४-१ अशी जिंकली होती. यात सर्फराज आणि ध्रुवने दमदार कामगिरी केली होती. या कसोटी मालिकेत सर्फराज खानने सलग तीन अर्धशतकं झळकावली तर ध्रुवने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसऱ्याच सामनात ९० आणि ३९ धावांची मॅचविनिंग खेळी केली होती.

Exit mobile version