मुलाला कसोटी पदार्पणाची कॅप मिळताच वडिलांना अश्रू अनावर

तिसऱ्या कसोटीत युवा यष्टिरक्षक ध्रुव जुरेल यालाही संधी

मुलाला कसोटी पदार्पणाची कॅप मिळताच वडिलांना अश्रू अनावर

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवार, १५ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताकडून दोन खेळाडूंनी पदार्पण केले. केएल राहुलच्या माघारीमुळे एक जागा रिक्त झाली होती आणि यष्टिरक्षक फलंदाज केएस भरत याला बसवले गेले. त्यामुळे ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान यांना संघात जागा मिळाली. यावेळी मैदानावर काहीसे भावूक वातावरण पाहायला मिळाले.

सर्फराज खान याला कसोटी कॅप मिळालेली पाहून त्याचे वडील नौशाद खान खूप भावूक झाले. मैदानातच त्यांना त्यांचे अश्रू अनावर झाले. अनिल कुंबळे यांच्या हस्ते सर्फरालजा कसोटी पदार्पणाची कॅप दिली गेली, तेव्हा शेजारीच उपस्थित असलेले त्याचे वडील भावनिक क्षणी रडू लागले. तर, दिनेश कार्तिकने जुरेल याला कसोटी कॅप दिली.

रजत पाटीदारला दुसऱ्या कसोटीत संधी दिली गेली होती, परंतु त्याला फार चांगली कामगिरी करता आली नाही. यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत यालाही आतापर्यंत त्याच्या खेळाने चमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत युवा यष्टिरक्षक ध्रुव जुरेल याला संधी मिळेल अशी चर्चा होती. त्यात केएल राहुलच्या माघारीमुळे तिसऱ्या सामन्यात सर्फराज आणि जुरेल यांचे पदार्पण पक्के झाले होते.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. सर्फराज आणि जुरेल यांचे पदार्पण झाले असून जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचे पुनरागमन झाले आहे. तर, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांना विश्रांती देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. गोपछडेंना भाजपाची उमेदवारी

काँग्रेसने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी २००७ मध्येच फेटाळल्या होत्या!

हल्दवानीमध्ये छतावरून दगडफेक करणाऱ्या महिलांवर होणार कारवाई!

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या नातवाचा काँग्रेसला रामराम

भारतीय संघ-

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रजत पाटीदार, मोहम्मद सिराज

इंग्लंडचा संघ-

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन

Exit mobile version