उत्कृष्ट कौशल्याचे एक उदाहरण तेलंगणामध्ये घडले आहे. एका प्रदर्शनात, तेलंगणातील एका हातमाग विणकराने माचिसच्या पेटीत बसणारी शानदार साडी विणली आहे.
विजय नावाचा विणकर तेलंगणातील राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यातील आहे. त्याने तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव, व्ही श्रीनिवास गौड, पी सबिथा इंद्रा रेड्डी आणि एराबेली दयाकर राव यांच्यासमोर त्याने विणलेली साडी प्रदर्शित केली. आणि त्याने ही साडी सबिता इंद्रा रेड्डी यांना भेट दिली आहे.
साडीची व विजयच्या कौशल्याची मंत्र्यांनी खूप प्रशंसा केली.’ तेलंगणा सरकारने विणकर समुदायांसाठी घेतलेल्या उपाययोजनांमुळे सिरसिल्ला येथील विणकर समुदायामध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत. विणकर आता प्रगत विणकाम तंत्रज्ञान, लूम आणि पद्धती याचा वापर करत आहेत .’ असे विजयने मंत्र्यांना सांगितले.
हातमाग मंत्री केटी रामाराव यांनी विजयच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि सांगितले की, त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी राज्य सरकार त्याला सर्व सहकार्य करेन. सरसिल्ला येथील हातमाग युनिटच्या उद्घाटनासाठी मंत्र्यांनी विजय यांना खास आमंत्रित केले होते. इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत शिक्षण मंत्री पी सबिता इंद्रा रेड्डी यांच्यासमोर मॅचबॉक्समध्ये पॅक केलेली साडी सादर केल्यावर सगळे चक्क झाले होते . पी सबिता इंद्रा रेड्डी म्हणाल्या, “मी नेहमी विणकरांच्या कौशल्याबद्दल ऐकले आहे. आमच्या सिरसिल्लामधून अशा साडीचे प्रदर्शन होताना पाहून मला आनंद झाला आहे.
विजयला स्वतःच्या हातांनी ही साडी बनवण्यासाठी सहा दिवस लागले. मात्र हीच साडी तयार करण्यासाठी मशीन वापरली गेली असती तर ती पूर्ण होण्यासाठी फक्त दोन दिवस लागले असते. किमतीच्या बाबतीत, विजय म्हणाला की, ‘ पारंपरिक लूमवर विणलेल्या साडीची किंमत सुमारे बारा हजार रुपये आहे आणि ती साडी मशीनवर बनवल्यास सुमारेआठ हजार रुपये खर्च येईल.
हे ही वाचा:
‘मुख्यमंत्रीजी, आम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतो, तुम्ही शाळा सुरू करा’
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाउंट हॅक
आज १२ आमदारांना निलंबित केले, उद्या १२० जणांना कराल!
२०१० मध्ये, जेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे त्यांच्या पत्नी मिशेल ओबामासोबत जेव्हा भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा बँगलोरमध्ये मिशेल यांना फक्त ३० ग्रॅम वजनाची साडी भेट म्हणून दिली गेली होती. ती साडीसुद्धा माचिसमध्ये राहू शकत होती. आर. नारायणप्पा (६९) आणि पत्नी कमलम्मा (६५) या वृद्ध जोडप्याने ही साडी बनवली होती.