उज्जैनमध्ये सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर जमावाचा हल्ला, दोन्ही गटांकडून दगडफेक!

पोलिसांकडून तपास सुरु

उज्जैनमध्ये सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर जमावाचा हल्ला, दोन्ही गटांकडून दगडफेक!

मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील मेकडोन येथे महापुरुषांचे पुतळे ठेवण्यावरून वाद झाला आहे.यावरून दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली.बुधवारी (२४ जानेवारी) रात्री बसवण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जमावाकडून ट्रॅक्टरने खाली पाडण्यात आला.या ठिकाणी डॉ.भीमराव आंबेडकर यांचा पुतळा बसवायचा होता.परंतु, सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी पुतळा बसविण्यात आल्याने जमावाकडून पुतळा पाडण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मेकडोनच्या मंडी गेटवर पुतळा बसवण्यावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. भीम आर्मीला बाबासाहेब यांचा पुतळा बसवायचा होता.तर पाटीदार सजला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बसवायचा होता.

हे ही वाचा:

कांदिवली: १८ ते २५ वयोगटातील नवीन मतदारांशी पंतप्रधान साधणार संवाद!

इंडी आघाडीला मैत्रीपूर्ण “खंजीरा”चा महामंत्र

युक्रेनच्या सीमेजवळ रशियन विमान कोसळले, ६५ जणांचा मृत्यू!

मनोज जरांगेंना न्यायालयाकडून नोटीस; आझाद मैदानात ५ हजारहून अधिक लोक जमण्यास मज्जाव

मात्र, बुधवारी (२४ जानेवारी) रात्री काही लोकांकडून मेकडोनच्या मंडी गेटवर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बसवला.त्यामुळे संतापलेल्या जमावाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा ट्रॅक्टरने खाली पाडण्यात आला.या घटनेने दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली.संतप्त जमावाने अनेक वाहनांची तोडफोड करत काही वाहने जाळली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहचेल.या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक सचिन शर्मा यांनी सांगितले. घटनास्थळी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. याशिवाय दोषींवर एफआयआर दाखल करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version