24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषसरबजीत यांचा मारेकरी मारला गेला, मात्र न्याय मिळाला नसल्याची मुलीची खंत

सरबजीत यांचा मारेकरी मारला गेला, मात्र न्याय मिळाला नसल्याची मुलीची खंत

Google News Follow

Related

भारतीय नागरिक सरबजीत सिंग याच्या हत्येला कारणीभूत असणारा आमिर सरफराज तांबा याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असली तरी सरबजीत यांची मुलगी स्वपनदीप कौर यांनी हा न्याय नसल्याचे म्हटले आहे. सरबजीत यांच्या मारेकऱ्याची हत्या झाल्याचे वृत्त जेव्हा त्यांनी प्रथम ऐकले तेव्हा त्यांना समाधान वाटल्याची कबुली त्यांनी दिली. ‘पहिल्यांदा मला समाधान वाटले. मात्र नंतर हा काही न्याय नाही, असा विचार माझ्या मनात आला. माझ्या वडिलांना का ठार मारले गेले, याचा शोध घेण्यासाठी आम्हाला खटल्याची सुनावणी हवी आहे,’ असे स्वपनदीप यांनी सांगितले. तसेच, सरबजीत आणि तांबा या दोघांच्या हत्येमागे पाकिस्तानी सरकारचाच हात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

‘जर माझ्या वडिलांच्या हत्येत तीन ते चार जण सामील होते तर, (पाकिस्तान सरकार) त्या वेळी घडलेला कट लपवण्यासाठी त्या माणसाची (तांबा) हत्या करून त्यावर पांघरूण घालत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. आमिर सरफराज तांबा याची लाहोरमध्ये रविवारी गोळी झाडून हत्या झाली. ब्रिटिश वृत्तपत्र गार्डियनने नुकतेच पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अशा प्रकारच्या हत्यांचा संबंध भारताशी जोडला होता. मात्र भारताने हे दावे फेटाळून लावले होते.

हे ही वाचा:

रामनवमीसाठी अयोध्येतील राम मंदिरात प्रसादासाठी १ लाख ११ हजार १११ किलोचे लाडू

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ म्हणतो, मी झाडली सलमानच्या घरावर गोळी!

इंडी आघाडीचा जाहीरनामा देशाला दिवाळखोर बनवणारा

विम्याच्या पैशांसाठी फारुकने कुटुंबाच्या साथीने केली मानसिकदृष्ट्या विकलांगाची हत्या

सरबजीत यांना दहशतवाद आणि हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तान सरकारने दोषी ठरवले होते. सरबजीत यांच्यावर लाहोरच्या कॉट लखपत तुरुंगात २६ एप्रिल, २०१३ रोजी हल्ला झाला होता. १ मे रोजी त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. सन २०१८मध्ये तांबा आणि सहआरोपी मुदस्सर यांची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने सुटका केली होती. सरबजीत यांची बहीण दलजीत कौर यांनी सरबजीत यांच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले होते. त्यांचे जून २०२२मध्ये देहावसान झाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा