संतूरसूर हरपला!

संतूरसूर हरपला!

प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे आज निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यापासून ते किडनी संदर्भातील त्रासाशी झगडत होते. गेले सहा महिने ते डायलिसिसवर होते. अखेर मंगळवार १० मे रोजी त्यांना देवाज्ञा झाली.

जम्मू कश्मीर या राज्यात ज्या वाद्याची पाळेमुळे आहेत अशा संतूर या वाद्याला पंडित शिवकुमार शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. संतूर हे एक शास्त्रीय वाद्य म्हणून ओळखले जावू लागले. सतार आणि सरोद सारख्या इतर सांस्कृतिक वाद्यां प्रमाणेच संतूरलाही प्रतिष्ठा प्राप्त झाली. यात पंडीत शिवकुमार शर्मा यांचे मोठे योगदान आहे.

१३ जानेवारी १९३८ रोजी पंडित शिवकुमार शर्मा यांचा जम्मू काश्मीर मध्ये जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी संतूर वाद्य शिकायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या वाद्यासाठीच समर्पित केले. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८६ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर त्यानंतर १९९१ साली पद्मश्री आणि २००१ साली पद्मविभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत त्यांनी काही चित्रपटांना संगीतही दिले. ज्यामध्ये सिलसिला, लम्हे, चांदनी अशा प्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

राज ठाकरे माफी मांगो, उत्तर प्रदेशात शक्तीप्रदर्शन

रेल्वे स्थानकावर जीवंत स्फोटके सापडल्याने नागपूरमध्ये खळबळ

नाना पटोलेही करणार अयोध्या वारी

‘उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची ट्युशन घ्यावी’

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून पंडित शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने आपल्या कलाविश्वाची मोठी हानी झाल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version