संतोष देशमुख हत्याप्रकरण सध्या राज्याचा चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज (१ जानेवारी) जलसमाधी आंदोलन केले. फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
गावकऱ्यांनी परिसरातील पाझर तलावात जलसमाधी आंदोलन केले. संपूर्ण गाव तलावात उतरले होते. या जलसमाधी आंदोलनात पुरुषांसह महिला देखील सहभागी झाल्या होत्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची भेट घेतली.
यावेळी आंदोलकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस अधीक्षक कॉवत यांनी आंदोलकांची समजूत काढून आंदोलन शांत केले. पोलीस अधीक्षक कॉवत म्हणाले, १० दिवसांमध्ये आरोपींना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या प्रकरणातील फरार तीन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले आहे. त्यानुसार पुढील तपास सुरु आहे, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. दरम्यान, पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले आहे.
हे ही वाचा :
“केजरीवालांनी खोटे बोलण्याची आणि फसवणुकीची वाईट सवय सोडून द्यावी”
‘हे वर्ष नवीन संधी, अनंत आनंद घेऊन येवो’
मणिपूरच्या इंफाळमध्ये अतिरेक्यांकडून गोळीबार आणि बॉम्ब हल्ला!