27.9 C
Mumbai
Friday, January 3, 2025
घरविशेषसंतोष देशमुख केस जाणीवपूर्वक सीआयडीला दिली, कोणालाही सोडणार नाही!

संतोष देशमुख केस जाणीवपूर्वक सीआयडीला दिली, कोणालाही सोडणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य 

Google News Follow

Related

संतोष देशमुख हत्येप्रकरणात सहभाग असल्याचा आरोप असणाऱ्या वाल्मिक करडाने सीआयडी समोर आज गुडघे टेकले. वाल्मिक कराड अनेक दिवसांपासून फरार होता. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल होता. पोलिसांकडून त्याचा शोध असताना आज तो शरण आला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. संतोष देशमुख केस जाणीवपूर्वक सीआयडीला देण्यात आली असून कोणालाही सोडणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बीड हत्या प्रकरणी कोणालाही सोडणार नाही. या प्रकरणाशी ज्याचा संबंध आढळून येईल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. गुंडांचे राज्य चालू देणार नाही. कोणालाही हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही. तपास गतिशील केल्यामुळे वाल्मिक कराडला शरणागती पत्करावी लागली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

मणिपूर हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मागितली माफी

खोदकामादरम्यान संभलमधील पायरीच्या विहिरीचा दिसला दुसरा मजला!

मुस्लीम तरुणांना कट्टरपंथी बनवल्याच्या आरोपाखाली बांगलादेशी दहशतवाद्याला ७ वर्षांची शिक्षा!

पुण्यात रेल्वे उलटवण्याचा कट; रेल्वे मार्गावर सापडला गॅसने भरलेला ‘सिलेंडर’

फरार आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके कामाला लागली आहेत. संतोष देशमुख यांच्या बंधूंशी फोनवर चर्चा झाली असल्याचे मुखमंत्र्यांनी सांगितले. सर्व दोषींना शोधून, जोपर्यंत ते फासावर लटकत नाहीत तोपर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील असा विश्वास मी त्यांना दिला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

पुराव्यांच्या आधारे आरोपींवर गुन्हे दाखल होतील कोणालाही सोडण्यात येणार नाही. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आली. त्यांना पूर्ण स्वायतत्ता देण्यात आली आहे. आमच्याकडून पुरावे शोधण्याचे काम सुरु आहे, ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी आमच्याकडे द्यावे. संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत असलेल्या लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचे आहे. काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचे आहे, त्यांना ते लखलाभ. संतोष देशमुख यांना आम्ही न्याय मिळवून देवू, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा