23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषराजीव गांधींच्या मारेकऱ्याचा चेन्नईच्या रुग्णालयात मृत्यू!

राजीव गांधींच्या मारेकऱ्याचा चेन्नईच्या रुग्णालयात मृत्यू!

यकृत निकामी झाल्यामुळे रुग्णालयात केले होते दाखल

Google News Follow

Related

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या १९९१ च्या हत्येतील सात दोषींपैकी एक टी सुतेंद्रराजा उर्फ संथन (५५) याचा बुधवारी चेन्नईच्या रुग्णालयात मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.विशेष म्हणजे, राजीव गांधी यांची हत्या केलेल्या आरोपी संथनला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावावर असलेल्या चेन्नईच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.या ठिकाणी सकाळी ७:५० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले, असे रुग्णालयाचे डीन डॉ. व्ही थेरनीराजन यांनी सांगितले.

डॉ. व्ही थेरनीराजन यांनी सांगितले की, संथनचे यकृत निकामी झाले होते.त्यामुळे उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तसेच इतर आजाराने देखील तो ग्रस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.आज पहाटे ( २८ फेब्रुवारी) ४ च्या सुमारास त्याला हृदयविकाराचा झटका आला परंतु सीपीआरच्या मदतीने त्याला वाचवण्यात आले.मात्र, नंतर सकाळी ७.५० च्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला अन त्याचे निधन झाले, असे डॉक्टरांनी सांगितले.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी १९९९ मध्ये सुप्रीम कोर्टाने संथनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, जी नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली.तथापि, नोव्हेंबर २०२२ मध्ये संथनसह इतर पाच जणांना सोडण्यात आले.या सर्व आरोपींना ३२ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीसांच्या टीकास्त्रानंतर मनोज जरांगेंनी मागितली माफी

हिमाचलमध्ये काँग्रेस दुभंगली; मंत्र्यांचा राजीनामा आणि राज्यसभेत क्रॉस वोटिंग

पिसेतल्या आगीनंतर मुंबईत ५ मार्चपर्यंत १५ टक्के पाणीकपात!

“ईडीकडून पाठविण्यात आलेल्या समन्सचा आदर करून त्याचे उत्तर द्यावे लागेल”

सुटका झाल्यानंतर या आरोपींना त्रिची सेंट्रल जेलच्या विशेष कॅम्पसमध्ये ठेवण्यात आले होते.संथन हा मूळचा श्रीलंकन नागरीकी असल्याने ना त्याच्याकडे पासपोर्ट होते ना प्रवासाची कोणतीही कागदपत्रे. तामिळनाडू सरकारने अलीकडेच मद्रास उच्च न्यायालयाला कळवले होते की, श्रीलंकेने संथनला त्याच्या मायदेशी परतण्यासाठी तात्पुरती प्रवासी कागदपत्रे जारी केली आहेत.मात्र, या आधीच संथनाचा मृत्यू झाला.

दरम्यान, १९९१ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली.लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) शी संबंधित असलेल्या व्यक्तीने बॉम्बअंगावर चढवून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याजवळ जाऊन स्फोट घडवून आणला. राजीव गांधीची ही हत्या भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे.सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) च्या म्हणण्यानुसार, संथन हा एलटीटीईच्या गुप्तचर शाखेचा सदस्य होता आणि त्याने राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटात भूमिका बजावली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा