गुगल ट्रान्सलेटमुळे वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद साधताना फारसा अडथळा येत नाही. त्यात आता आता गुगलने जगभरातील आणखी २४ भाषांचा समावेश गुगल ट्रान्स्लेशनमध्ये केला आहे. विशेष म्हणजे यात संस्कृत भाषेला स्थान देण्यात आले आहे. संस्कृतसह भारतातील आणखी आठ भाषा नव्याने समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
संस्कृत भाषेचा समावेश गुगल ट्रान्सलेटमध्ये करण्यात यावा यासाठी मोठी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर संस्कृत व्यतिरिक्त कोंकणी, डोंगरी, आसामी, मिझो, मणिपूरी (मेटेलियन), भोजपूरी, मैथिली या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. जगातील एकूण १३३ भाषा गुगल ट्रान्सलेटवर उपलब्ध आहेत.
संस्कृत भाषा गुगल ट्रान्स्लेशन मध्ये समाविष्ट करावी यासाठी सगळ्यात जास्त मागणी होती, असे गुगलच्या संशोधन टिमचे आयझॅक कॅझवेल यांनी ‘इकॉनॉमिक टाईम्स’शी बोलताना सांगितले आहे.
हे ही वाचा:
आम्ही घरूनच काम करणार, म्हणत कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा
संभाजी राजेंच्या नव्या संघटनेची घोषणा
मुंब्र्यात वसुली सरकार, पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटले
पद्मश्री डॉ. रमाकांत शुक्ला यांचे निधन
भारतात साधारण २० हजार जण संस्कृत भाषेचा वापर करतात. मिझो ८ लाख ८३ हजार जण बोलतात. ईशान्य भारतातील आसामी भाषा सुमारे २ कोटी ५० लाख जण बोलतात. तसेच कोंकणी भाषेचा वापर साधारण २० लाख लोक करतात. या भाषांचा समावेश करताना भाषा बोलणारे नागरिक, स्थानिक भाषांचे अभ्यासक यांनी गुगलला यासंदर्भात मदत केली. तसेच गुगल ट्रान्सलेट वापर आणखी सहज, सोपा करण्यासाठी देखील गुगलने प्रयत्न केले आहेत.