मागील महिन्यात बोटाच्या शस्त्रक्रिया केल्यानंतर संजू सॅमसन सोमवारी राजस्थान रॉयल्स संघात सामील झाला आहे. सॅमसन बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपचार घेत होता. तो सध्या यष्टिरक्षण करणार की नाही, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. जर सॅमसन पूर्णतः तंदुरुस्त नसेल, तर ध्रुव जुरेल यष्टिरक्षक म्हणून पर्याय ठरू शकतो.
फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध पाचव्या टी२० सामन्यातही जुरेलने सॅमसनच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षणाची जबाबदारी पार पाडली होती. त्या सामन्यात फलंदाजी करताना जोफ्रा आर्चरच्या चेंडूने सॅमसनच्या बोटाला इजा झाली होती.
हेही वाचा :
नागपूरची घटना सुनियोजित, ट्रॉलीभर दगड, मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त!
“नागपुरातील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट”
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात बाहेरून आलेल्या लोकांनी घातला राडा; पोलिसांवर दगडफेक, वाहनांची जाळपोळ
उत्तर प्रदेश: परीक्षेसाठी आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सपा नेत्याकडून अत्याचार!
खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला रियान पराग देखील राजस्थान रॉयल्ससाठी खेळण्यासाठी सज्ज आहे. या दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर पडला होता, मात्र रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने पुनरागमन केले. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले आणि २६ षटके गोलंदाजीही केली.
राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना २३ मार्च रोजी हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. त्यानंतर संघ २६ मार्च आणि ३० मार्चला गुवाहाटीमध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सलग दोन घरच्या सामन्यांत खेळणार आहे.