भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे येत्या १० नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यांनी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. केंद्र सरकारने ही शिफारस मान्य केल्यास न्यायमूर्ती खन्ना १० नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारताचे ५१ वे सरन्यायाधीश असतील. न्यायमूर्ती चंद्रचूड त्याच दिवशी निवृत्त होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे येत्या १० नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. धनंजय चंद्रचूड हे दोन वर्ष त्यांच्या पदावर राहिल्यानंतर सेवानिवृत्त होणार आहेत. निवृत्तीपूर्वी त्यांनी न्या. संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. केंद्राने याला हिरवा सिग्नल दिल्यास ते पदभार स्वीकारतील आणि न्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ २३ मे २०२५ पर्यंत असेल. सुमारे साडेसहा महिने ते या पदावर राहणार आहेत. न्या. संजीव खन्ना ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.
Chief Justice of India DY Chandrachud has formally proposed Justice Sanjiv Khanna as his successor. In a communication to the Union government, Chief Justice Chandrachud stated that since he is demitting office on November 11, Justice Khanna would be his successor.
Upon approval… pic.twitter.com/LgH8PqvDyr
— ANI (@ANI) October 17, 2024
हे ही वाचा :
बाबा सिद्दिकी हत्या: मुख्य संशयित शुभम लोणकर विरोधात लुक आउट सर्क्युलर जारी
न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन् हातात तलवारीच्या जागी संविधान
विमानांना वारंवार मिळणाऱ्या धमक्यांचा केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडून निषेध
लाडकी बहिण योजनेला बंद कराल तर ‘करेक्ट कार्यक्रम’ झालाच समजा!
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला. त्यांचे वडील न्यायमूर्ती देव राज खन्ना हे देखील दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. त्यांची आई सरोज खन्ना या एलएसआर डीयूमध्ये लेक्चरर होत्या. खन्ना यांनी १९८० मध्ये दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. यानंतर डीयूमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९८३ मध्ये बार कौन्सिल ऑफ दिल्लीमध्ये वकील म्हणून काम सुरू केले. सुरुवातीला दिल्लीच्या तिसहजरी कॅम्पसमध्ये सराव सुरू केला. त्यानंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात विविध क्षेत्रांतील न्यायाधिकरणांमध्ये सराव केला. २००५ मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २००६ मध्ये स्थायी न्यायाधीश करण्यात आले. २००६ ते २०१९ या कालावधीत उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर १८ जानेवारी २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली.