आयपीएस संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक असणार आहेत. डीजीपी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्यानंतर संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. महासंचालक पदासाठी तीन नावे चर्चेत होती. आज अखेर संजय वर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
डीजीपी रश्मी शुक्ला यांना हटवल्यानंतर, केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे महाराष्ट्र केडरमधील तीन सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे मागवली होती, ज्यापैकी संजय वर्मा हे एक आहेत. या शर्यतीत अन्य दोन वरिष्ठ अधिकारी संजीव कुमार सिंघल आणि अधिकारी रितेश कुमार यांचा सहभाग होता.
डीजीपी रश्मी शुक्ला यांच्या बदलीनंतर विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त महासंचालक पदाचा कार्यभार देण्यात आला होता. यानंतर आता संजय वर्मा यांची महासंचालकपदी निवड करण्यात आली आहे. डीजी संजय वर्मा यांच्यावर सध्या कायदा आणि तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी आहे.
हे ही वाचा :
‘गाझावर १० ट्वीट, पण कॅनडातील हिंदूंबाबत मौन’
न्यायालयाचे स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकवेळी सरकारविरोधात निर्णय नव्हे!
दिल्लीतील हवेची गुणवत्ता घसरली पराली जाळल्यामुळे आणि गाड्यांच्या धुरामुळे
चौकशीसाठी हजर राहा! सिद्धरामय्या यांना समन्स
राज्यातील विरोधी पक्षांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी सातत्त्याने निवडणूक आयोगाकडे केली जात होती. निवडणूक आयोगाने याची दाखल घेत काल रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली. यानंतर आता राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, आयपीएस संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे पोलिस अधिकारी आहेत. ते सध्या महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या डीजीपी पदासाठी ज्या आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती, त्यात ते आघाडीवर होते.