बोरिवलीतून संजय उपाध्याय, वसईतून स्नेहा दुबे, तर सावनेरमधून आशिष देशमुख!

भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

बोरिवलीतून संजय उपाध्याय, वसईतून स्नेहा दुबे, तर सावनेरमधून आशिष देशमुख!

महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आज (२८ ऑक्टोबर) तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. २५ उमेदवारांची ही यादी आहे. यापूर्वी पक्षाने २६ ऑक्टोबर रोजी आपली दुसरी यादी जाहीर केली होती, त्यामध्ये एकूण २२ उमेदवारांची नावे होती. तर २० ऑक्टोबर रोजी भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली होती.

भाजपाच्या २५ उमेदवारांच्या तिसऱ्या यादीमध्ये बोरीवलीमधून संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्नेहा दुबे यांना वसईमधून उमेदवारी देण्यात आली आहे तर वर्सोवामधून भारती लव्हेकर यांना उमेदवारी दिली आहे. आशिष देशमुख यांना सावनेर मधून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, पक्षाने जाहीर केलेल्या तिन्ही यादींच्या उमेदवारांची संख्या १४६ झाली आहे. तर दुसरीकडे अर्ज भरण्याची उद्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे कदाचित उर्वरित उमेदवारांची यादी आज येण्याची प्रतीक्षा आहे.

हे ही वाचा :

संत एकनाथ महाराजांच्या वंशजांचा आशीर्वाद घेत एकनाथ शिंदेंनी भरला उमेदवारी अर्ज

‘वारी एनर्जी म्हणजे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोलाची भर!’

मारुतीचे दर्शन घेत अजित पवार, युगेंद्र पवारांनी बारामतीतून केले अर्ज दाखल

ऑस्ट्रेलियात दोन हिंदू मंदिरांची तोडफोड

भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी 

१) हरीश पिंपळे – मुर्तीजापूर
२) सई डहाके – कारंजा लाड
३) राजेश वानखेडे – तेओसा
४) उमेश यावलकर – मोर्शी
५) सुमित वानखेडे – आर्वी
६) चरणसिंह ठाकूर – काटोल
७) आशिष देशमुख – सावनेर
८) प्रवीण दटके – नागपूर मध्य
९) सुधाकर कोहळे – नागपूर पश्चिम
१०) मिलिंद माने – नागपूर उत्तर
११) अविनाश ब्राम्हणकर – साकोली
१२) किशोर जोगरेवार – चंद्रपूर
१३) राजू तोडसांब – आर्णी
१४) किशोर वानखेडे – उमरखेड
१५) जितेश अंतापुरकर – देगलूर
१६) विनोद मेढा – डहाणू
१७) स्नेहा दुबे – वसई
१८) संजय उपाध्याय – बोरीवली
१९) भारती लव्हेकर – वर्सोवा
२०) पराग शाह – घाटकोपर पूर्व
२१) सुरेश धस – आष्टी
२२) अर्चना चाकूरकर – लातूर शहर
२३) राम सातपुते – माळशिरस
२४) मनोज घोरपडे – कराड उत्तर
२५) संग्राम देशमुख – पळूस कडेगाव

 

Exit mobile version