मातोश्रीवर वक्फ बोर्डाची करडी नजर पडेल तेव्हा बोला!

आमदार चित्रा वाघ यांची टीका 

मातोश्रीवर वक्फ बोर्डाची करडी नजर पडेल तेव्हा बोला!

वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मांडले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा सत्र सुरु आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका टिप्पणी सुरु आहे. याच दरम्यान, उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांच्या टीकेनंतर भाजपाकडून जोरदार प्रत्युतर दिले जात आहे. भाजपा मंत्री नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर महिला आमदार चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर टीका करत निशाणा साधला. जेव्हा मातोश्रीवर वक्फ बोर्डाची करडी नजर पडेल तेव्हा बोला, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, ऐकलतं का सगळ्यांनी, सर्वज्ञानी रडत रौत स्वयंघोषित विश्वगुरु म्हणतात की वक़्फ़ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबंध नाही. जेव्हा मातोश्रीवर वक्फ बोर्डाची करडी नजर पडेल तेव्हा बोला.  रडत रौत जी, महाराजांच्या गडकिल्ल्यांवर अतिक्रमण होते तेव्हा हिंदुत्वाला धक्का पोहचतो, हिंदू मंदिरे वक्फ होतात तेव्हा हिंदुत्वाला धक्का पोहचतो, इथे फक्त हिंदुत्व नाही तर राष्ट्रीयत्वला धक्का पोहचतो.

पण तुम्हाला सत्तेची खाज सुटली आहे म्हणून इंदिरा गांधींचे गोडवे गात आहात…? वंदनीय हिंदूहृदयसम्राट यांचा साधा उल्लेखही तुमच्या ट्विट मध्ये नाही यातच सगळं आले. आज मी तुम्हाला विचारते बाळासाहेबांच्या संस्कारांना जागत तुम्ही वक्फ बोर्ड सुधारित बिलाच्या बाजूने मत देणार आहात का…? आहे का तुमच्यात हा दम…? बोला संजय राऊत, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

हे ही वाचा : 

‘आतापर्यंत वक्फ विधेयकात जे बदल झाले, ते मौलवींच्या दबावामुळे!’

काँग्रेस काळात समिती फक्त शिक्का मारायची

शुक्रिया मोदी जी ! भोपाळमध्ये मुस्लिम महिला मोदींच्या पाठीशी!

देशात मुलांना दत्तक घेण्याचा नवा विक्रम

दरम्यान, संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, देवेंद्र जी, वक़्फ़ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्ववाचा काडीमात्र संबध नाही, ही तुमच्या पक्षाची एक खाज आहे गोंधळ निर्माण करण्याची! विषय राहुल गांधींचा , त्यांच्या आजीने अमेरिकेला दम भरला होता; आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा बदला घेतला होता! तुमच्यात हा दम आहे? बोला.

मारून मुटकून मराठी ? | Mahesh Vichare | Raj Thackeray | Balasaheb Thackeray | Shivsena | MNS |

Exit mobile version