‘सामना’च्या कार्यालयाबाहेर संजय राऊतांना बॅनरमधून आव्हान!

सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा 'भाजपचा वाघ'

‘सामना’च्या कार्यालयाबाहेर संजय राऊतांना बॅनरमधून आव्हान!

सामना कार्यालयाच्या बाहेर भाजप आमदार नितेश राणे यांच्या समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा भाजपचा वाघ, अशा आशयाचे हे बॅनर लावण्यात आले आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांच्या समर्थकांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सामना कार्यालयाच्या समोरच आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांच्या समर्थकांनी मोठा बॅनर लावला आहे. सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा ‘भाजपचा वाघ’, दमदार आमदार हिंदू धर्मासाठी लढणारे आमदार नितेश राणे, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे आणि उद्धव ठाकरे यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता थेट नितेश राणे यांचे बॅनर सामनाच्या कार्यालयाबाहेर लागल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

हे ही वाचा:

लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रज्वल रेवण्णाच्या भावालाही अटक!

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या प्रमुखाची हकालपट्टी!

मान्सून जुलैपर्यंत वायव्य भारत व्यापेल!

पाकिस्तानच्या संसदेतही पाक कर्णधार बाबर आझम ट्रोल!

विशेष म्हणजे बॅनरमधील मजकूर हा संजय राऊतांना टार्गेट करतो. सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा भाजपचा वाघ, अशा मजकूरचा अर्थ म्हणजे, उबाठाचे नेते संजय राऊत दररोज येऊन पत्रकार परिषद घेण्याचे काम करतात. त्यामुळे भाजप आमदार नितेश राणे यांच्या समर्थकांनी त्यांना वाढदिसाच्या शुभेच्छा देत बॅनरमधून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Exit mobile version