देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेवून राज्याचा कारभार हाती घेतला. फडणवीसांच्या हाताला हात धरत एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काल (५ डिसेंबर) शपथ सोहळा पार पडला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा मोह असल्यामुळे सोडताना त्रास होतोय, असे शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार शंभूराजे देसाई यांनी प्रत्युतर देत उबाठाच्या आजच्या अवस्थेला संजय राऊत जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा मोह आहे म्हणून पद सोडताना एवढा त्रास होतोय, उद्धव ठाकरेंनी एकदा मुख्यमंत्री पद त्यागले होते. यावर उत्तर देताना शंभूराजे देसाई म्हणाले, संजय राऊत यांनी २०१९ च्या निकालाच्या अगोदरच कालावधी आठवावा. ज्या उमेदवारांना विधानसभेची टिकेट दिले होते, ते निवडणूक आले, त्यावेळी झालेल्या बैठीकीमध्ये संजय राऊत देखील होते.
हे ही वाचा :
आता बदल्याचे नाहीतर बदल दाखवण्याचे राजकारण!
आंबिवलीच्या इराणी वाडीत मुंबई पोलिसांवर दगडकाठ्यांनी हल्ला, ५ अटकेत
काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या बाकाखाली सापडले ५० हजार रुपयांचे बंडल, चौकशीचे आदेश!
विक्रमवीर आमदार कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष!
या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे स्वतः आमच्याकडे बोट दाखवून म्हणाले, तुमच्यातील शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे आहे, शिवसैनिकांना मुख्यमंत्री करेन हा बाळासाहेबांना शब्द दिला होता, तो पूर्ण मला पूर्ण करायचा आहे. ते बोट आमच्याकडे होते, २०१९ ला जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हा ते बोट स्वतःकडे कसे आले?. त्यावेळी मुख्यमंत्री करण्यासाठी यांना शिवसैनिक दिसला नाही?, असा सवाल शंभूराजे देसाई यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, संजय राऊत यांनी विनाकारण उद्धव ठाकरेंचे नाव घेवून एकनाथ शिंदे यांच्याशी तुलना करू नये. उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी कोणी करावयास लावली. हे सर्वांना माहिती आहे. आज जी उबाठाची अवस्था झाली आहे, ती केवळ संजय राऊत यांच्यामुळे झाली आहे, असे शंभूराजे देसाई यांनी म्हटले.