स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात शिवसेनेच्या नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहेत. सर्व स्तरावरून माफी मागण्याची मागणी केली जात आहे. मात्र, कुणाल कामरा आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. जर कोर्टाने माफी मागण्यास सांगितले तर माफी मागेन, असे कुणाल कामरा म्हणाला आहे. दरम्यान, राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांवर आणि सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशी टिप्पणी करणे चुकीचे आहे. मात्र, विरोधक अशा गोष्टींचा विरोध करण्याऐवजी पाठराखण करताना दिसत आहेत. उबाठा गटाचे खासदार संजय राऊत हे देखील अशा लोकांच्या रांगेत बसत कुणाल कामराचा आणि माझा डीएनए सारखा असल्याचे म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले, कुणाल कामरा या क्षेत्रात नवीन आला तेव्हापासून तो त्याने त्या काळातल्या काँग्रेस पक्षावरसुद्धा अशाप्रकारचे शो केलेलं आहेत. काल जिथे तोडफोड केली तिथे मी अनेकदा गेलेलो आहे. माझ्यावर हे सगळे लोकं टीका करतात ना. मी ते ही सहन करतो. काल त्यांचा स्टुडिओ, व्यासपीठ तोडले. तरुण कलाकारांचे व्यासपीठ तुम्ही तोडले.
हे ही वाचा :
इलेक्ट्रॉनिक्स निर्यात ३ लाख कोटींपेक्षा अधिक होणार
निकोलस पूरनचा टी२० क्रिकेटमध्ये ६०० षटकारांचा टप्पा गाठला
ते पुढे म्हणाले, तुम्ही कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई करु शकत होता. पण यालाच औरंगजेबाचीवृत्ती म्हणतात. कुणाल कामराने काहीच चुकीचे केलेलं नाही. मी त्याला ओळखतो. त्याचा आणि माझा डीएनए सारखा आहे. कायदेशीर कारवाई केली पाहिजे. जर कुणाल कामरा हा चुकला आहे त्याने काहीतरी वेगळी भूमिका मांडली जी कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्याच्यावर तुम्ही कायद्याने कारवाई करा. त्याला अटक करा. तुम्ही त्याला अटकही करु शकता. तो कायदेशीर लढाई लढेल, असे संजय राऊत म्हणाले.