शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी आढळले आहेत. मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी संजय राऊत हे दोषी आढळले आहेत. माझगाव कोर्टाकडून संजय राऊतांना २५ हजारांचा दंड अन १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी माझगाव कोर्टात याचिका दाखल केली होती. मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा आरोप केला होता. या प्रकरणी मागील अनेक महिन्यांपासून सुनावणी सुरु होती. आज अखेर माझगाव कोर्टाने त्यांना दोषी ठरवले आणि कोर्टाने १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजारांचा दंड ठोठावला.
हे ही वाचा :
४०० कोटींच्या ऑनलाइन गेमिंग घोटाळ्याचा पर्दाफार्श; चीनी नागरिकांची क्रिप्टो खाती गोठवली
पावसाच्या व्यत्ययामुळे नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द!
न्युयॉर्कमधील मंदिरानंतर समाजकंटकांकडून कॅलिफोर्नियातील श्री स्वामीनारायण मंदिर लक्ष्य
आयसीपी सेक्शन ५ अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली होती. कतिथ शौचालय घोटाळ्या प्रकरणी मेधा सोमय्या या लाभार्थी असून त्यांच्या खात्यावर पैसे गेल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या संदर्भात मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात माझगाव कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखला केला होता. या प्रकरणावर आज माझगाव कोर्टाने निकाल दिला. यामध्ये शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत हे दोषी आढळले. कोर्टाने त्यांना २५ हजारांचा दंड अन १५ दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली.