मातोश्रीवर संजय राऊत यांना बुकलले? सोशल मीडियावर गरमागरम चर्चा

घटनेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही

मातोश्रीवर संजय राऊत यांना बुकलले? सोशल मीडियावर गरमागरम चर्चा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका बातमीने सध्या खळबळ उडवून दिली असून यावरून चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील वांद्रे येथील उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’वर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार संजय राऊत यांना मारहाण केली, अशा आशयाचे वृत्त सध्या व्हायरल झाले आहे. तसेच संजय राऊत यांना मारहाण करून हे कार्यकर्ते थांबले नाहीत तर संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना एका खोलीत बंद केले.

पुढील काही महिन्यांतचं मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. ठाकरे गटाच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अशीच आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत हे नाट्य घडल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संजय राऊत यांची शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर याचे रुपांतर हाणामारीत झाले.

हे ही वाचा : 

नव वर्षाच्या पहिल्या दिवशी लखनऊ हत्याकांडाने हादरलं; चार बहिणींसह आईची हत्या

संतोष देशमुख प्रकरण, आरोपीच्या अटकेसाठी मस्साजोग ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन!

“केजरीवालांनी खोटे बोलण्याची आणि फसवणुकीची वाईट सवय सोडून द्यावी”

‘हे वर्ष नवीन संधी, अनंत आनंद घेऊन येवो’

बैठकीदरम्यान ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी आरोप केला की, संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे आणि त्यांच्या भूमिकेमुळेचं पक्षाला अलीकडच्या काळात खूप नुकसान झाले आहे. या आरोपांमुळे खासदार संजय राऊत चिडले आणि यातून शाब्दिक भांडणाला सुरुवात झाली. पुढे या शाब्दिक चकमकीचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी राऊत यांना काही वेळ एका खोलीत कोंडून ठेवले. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या व्हिडिओत असा उल्लेख असल्याची चर्चा रंगली. यानंतर हिंदी माध्यमांनी यावरून बातमी करत खळबळ उडवून दिली. सध्या सोशल मीडियावर या वृत्ताची चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. संजय राऊत, उद्धव ठाकरे किंवा पक्षातील इतर कोणत्याही नेत्याने या वृत्तांवर भाष्य केलेले नाही.

Exit mobile version