मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यानंतर कोण?

मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यानंतर कोण?

पांडे यांना लागले निवृत्तीचे वेध

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या निवृत्तीसाठी आता काहीच दिवस उरले आहेl. मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त कोण असतील याबाबत अद्याप कुठेही चर्चा नसतांना पांडे यांना आता निवृत्तीचे वेध लागले आहे.

मुंबई पोलीस मुख्यालयात असलेले पोलीस आयुक्तांच्या चेंबर्सचे नूतनीकरण करण्यात आले असून सोमवारी हे चेंबर्स आयुक्तासाठी खुले करण्यात आले.

पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोमवारी दुपारी चेंबर्सचे उदघाटन नव्या चेंबर्समध्ये पत्रकारांसह प्रवेश केला.पत्रकारांना न भेटणारे, त्यांच्याशी संवाद न साधणारे संजय पांडे हे सोमवारी पत्रकारांशी मनमोकळे गप्पा मारत होते, माध्यामाच्या प्रतिनिधीनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे शांतपणे उत्तरे देत होते.

एका पत्रकारांने त्यांच्या कामाचे कौतुक केले असता त्यांनी शांतपणे उत्तर दिले की, ‘मी माझ्या कार्यकाळात घेतलेले निर्णय चांगले आहेत. माझ्या नंतर जे नवीन आयुक्त येतील त्यांना जर माझे निर्णय योग्य वाटले तर ते नियम पुढे कायम ठेवतील, त्याच बरोबर संडे स्ट्रीट आणि पोलिसांच्या बाबतीत मी घेतलेले निर्णय देखील योग्य होते. पुढचे आयुक्त त्यावर निर्णय घेतील, असे सांगत पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त होण्याची मनाची पूर्णपणे तयारी केल्याचे दिसून आले.

हे ही वाचा:

केळ्याने होत आहे रे! केळे विक्रेत्यामुळे लागला रिक्षा चोराचा शोध

चैन पडेना आम्हाला; आमदार निघाले हॉटेलला!

घर सोडलेल्या मुलांचा आधारू !

२००६ वाराणसी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला फाशी

 

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे हे जूनच्या शेवटच्या तारखेला निवृत्त होत आहे, त्यांच्या निवृत्तीला केवळ काही दिवसांची कालावधी बाकी आहे. मात्र मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त कोण असणार आहे याबाबत अद्याप कुठेही चर्चा नसल्यामुळे नवीन आयुक्त कोण असणार आहे याची उत्सुकता पोलीस दलासह सर्वानाच लागली आहे.

Exit mobile version