कीर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे संजय निरुपमना संताप

बाईक रॅलीला पोलिसांनी केला अटकाव

कीर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे संजय निरुपमना संताप

खासदार गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून टीका होत असताना अचानक काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे कीर्तीकरांवर घसरले.

गजानन कीर्तिकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांनी थेट बाईक रॅली काढण्याची घोषणा केली होती पण पोलिसांनी त्यांना बाईक रॅलीसाठी परवानगी दिली नाही. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली पण नंतर पत्रकारांना सामोरे जाताना कीर्तीकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

हे ही वाचा:

वाराणसीच्या धर्तीवर गोदावरीवर होणार महाआरती

राजेश खन्नाची ओळख असलेले इराणी हॉटेल होणार जमीनदोस्त

महिंद्रा एसयूव्हीला ‘लाख लाख’ शुभेच्छा

‘मिस्टर ३६०’ अजूनही अव्वलच

 

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यांनी केलेला पक्षप्रवेश उत्तर पश्चिम मुंबईतील मतदारांचा अपमान असल्याने त्यांनी त्वरित खासदारकीचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी माजी खासदार व काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे बुधवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता बाईक रॅली काढण्यात येणार होती. पण त्यापूर्वीच पोलिसांनी संजय निरुपम अटक करून, त्यांना वर्सोवा पोलिस ठाण्यात नेण्यात आले व बाईक रॅली काढण्यास अटकाव करण्यात आला.

काँग्रेसला कीर्तीकर यांचा हा शिंदे गटातील प्रवेश का बोचला याचे उत्तर मात्र मिळू शकले नाही. कीर्तीकर हे दुसऱ्या पक्षात गेलेले असल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी निरुपम यांनी केली. गेल्या अनेक दिवसांत निरुपम हे काँग्रेसच्या किंवा महाराष्ट्रातील राजकारणापासून अलिप्तच होते. पण कीर्तीकरांच्या निमित्ताने त्यांना नवा विषय मिळाला. मात्र त्यांना कीर्तीकरांवर एवढा राग का, याचे उत्तर लोक शोधत आहेत.

Exit mobile version