‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या ऍडिशनल प्रोग्रॅम सेक्रेटरी पदी संजय ढवळीकर यांची नियुक्ती!

पंतप्रधान मोदींच्या महत्वाकांक्षी योजना राबवण्यासाठी प्रोग्रॅमची आखणी

‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या ऍडिशनल प्रोग्रॅम सेक्रेटरी पदी संजय ढवळीकर यांची नियुक्ती!

‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या ऍडिशनल प्रोग्रॅम सेक्रेटरी पदी संजय ढवळीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजना राबवण्यासाठी, ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ हा उपक्रम, प्रशासकीय, व्यवस्थापकीय तसेच सामाजिक सुधारणांच्या अंलबजावणीसाठी आखला गेला आहे.

या उपक्रमाद्वारे ३० महत्वाच्या उद्योगांमध्ये, ३० प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यातील सुधारणांवर काम करून, त्यात योग्य बदल आणि रूपांतर आणुन, त्या कार्यकुशल करणे, हे महत्वाचे ध्येय असणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उदिष्ठांवर काम करून, विविध मंत्रालयांमध्ये मुलभूत बदलांद्वारे तळागाळातील पातळीवर अपेक्षित परिणाम घडवुन आणणे हे या उपक्रमाचे महत्वाचे लक्ष्य असणार आहे.

हेही वाचा..

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारसोबत चर्चेला तयार!

नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू

अरुणाचल प्रदेशात पुन्हा भाजप सरकार, पेमा खांडूं बनले मुख्यमंत्री!

जागतिक बँकेच्या ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ च्या वर्गवारी मध्ये भारताचे स्थान हे १४४ वरून ६३ वर आल्याने, आठ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या या उपक्रमाचे योगदान आणि महत्व हे मोठ्या प्रमाणावर अधोरेखित केले गेले आहे. दरम्यान, ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या ऍडिशनल प्रोग्रॅम सेक्रेटरी पदी संजय ढवळीकर यांची नियुक्ती करण्यात आली असून ते या उपक्रमा अंतर्गत विविध राज्य सरकार, केंद्र सरकार, आणि विशेष करून नीती आयोग आणि प्रधानमंत्री कार्यालया बरोबर काम करणार आहेत.

Exit mobile version