क्रीडा जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगरचा यांचा मुलगा आर्यन बांगर याने लिंग शस्त्रक्रिया केली आहे. लिंग शस्त्रक्रियेनंतर आर्यन बांगर आता अनया बांगर झाली आहे. याबाबत आर्यनने (आता अनाया) सोमवारी (११ नोव्हेंबर) लिंग बदलाचा (हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन) अनुभव शेअर केला आहे.
आर्यनने ११ महिन्यांपूर्वी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) करून घेतली होती. त्याने लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या हार्मोनल बदलांबद्दल खुलेपणाने सांगितले. त्याने आपले नाव बदलून अनया ठेवले आहे. २३ वर्षीय आर्यनने सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले – ‘मी शक्ती गमावत आहे, परंतु आनंद मिळवत आहे. शरीर बदलत आहे, डिसफोरिया कमी होत आहे. अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, पण प्रत्येक पाऊल मला माझ्यासारखे वाटत आहे. दरम्यान, आर्यन (अनया) देखील एक क्रिकेटर आहे. तो डावखुरा फलंदाज आहे जो इस्लाम जिमखाना या स्थानिक क्रिकेट क्लबसाठी क्रिकेट खेळतो. त्याने लीसेस्टरशायरमधील हिंकले क्रिकेट क्लबसाठीही खूप धावा केल्या आहेत.
हे ही वाचा :
बॅगेची तपासणी होताच उद्धव ठाकरेंची आग-आग
संजीव खन्ना यांचे काका ५० वर्षांपूर्वीच होणार होते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य नाययमूर्ती
खलिस्तानी दहशतवादी पन्नूनने राम मंदिरावर हल्ला करण्याची दिली धमकी
इराकमध्ये अजब कायदा; आता पुरुषांना ९ वर्षांच्या मुलीशीही लग्न करता येईल !
ईसीबीच्या नियमांमुळे करिअर संपले
२० ऑक्टोबर रोजी इंग्लिश आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ट्रान्सजेंडर महिलांना महिला व्यावसायिक क्रिकेटमधून बंदी घातली. यामुळे आर्यन (अनया) यापुढे महिला क्रिकेटमध्ये भाग घेऊ शकणार नाही.
हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) म्हणजे काय?
या प्रक्रियेत स्त्री किंवा पुरुषाचे हार्मोन्स बदलून त्यांचे लिंग बदलले जाते. यामध्ये प्लास्टिक सर्जरीचीही मदत घेतली जाते. भारतात २०१४ मध्ये मान्यता मिळाली. लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेच्या संपूर्ण प्रक्रियेत किमान चार डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि एक न्यूरो सर्जन यांचा सहभाग असतो. ही शस्त्रक्रिया २१ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांवरच केली जाते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यापेक्षा लहान मुलांमध्ये, पालकांकडून लेखी संमती घेतल्यानंतरच ऑपरेशन केले जाते.
दरम्यान, आर्यनचे वडील संजय बांगर हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आहेत. ते २०१४- २०१८ पर्यंत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक होते आणि आयपीएल २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. संजय बांगर यांनी १२ कसोटी सामने आणि १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.