सांगली, कोल्हापूरमध्ये २०१९ची पुनरावृत्ती होणार?

सांगली, कोल्हापूरमध्ये २०१९ची पुनरावृत्ती होणार?

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील अनेक शहरं आणि गावं पाण्याखाली गेली आहेत. नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आता सांगली आणि कोल्हापूरला देखील महापुराचा धोका निर्माण झाला आहे. २०१९ सालासारखा पुन्हा एकदा या दोन्ही जिल्ह्यांना पुराचा सामना करावा लागू शकतो.

सांगलीला पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी ५० ते ४२ फुटापर्यंत वर जाऊ शकते. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयनेतून आज दुपारपर्यंत पन्नास हजार क्युसेस विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी सध्याच्या पाणीपातळी पेक्षा दहा ते बारा फुटाने अधिक वाढू शकते. सखल भागातील नागरिकांनी, नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, यासाठी प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. सांगलीत संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता महापालिकेकडून पूर पट्ट्यात नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन केले जात आहे.

मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह टीम पूर पट्ट्यात फिरून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. सांगलीत काल सायंकाळी ७ च्या सुमारास पूर पातळी २७ वर पोहोचल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून खबरदारी म्हणून पूर पट्ट्यात नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. आहेत.  ज्यांच्याकडे राहण्याची सोय नाही अशा नागरिकांसाठी महापालिकेने शाळा क्रमांक १४ आणि शाळा क्रमांक २४ या दोन ठिकाणी तात्पुरता निवारा केंद्र सुरू केले आहे. रात्रीत पाणी पातळी वाढणार असल्याने महापालिका प्रशासन सज्ज झाले असून महापालिकेचे वैद्यकीय, आपत्कालीन तसेच अग्निशमन विभागाकडून पूर स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

हे ही वाचा:

राज्याला ड्रायव्हर नको तर लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा

संरक्षण क्षेत्रात मोदी सरकारकडून ‘ही’ नवी सुधारणा

मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघाले का?

लडाखच्या विकासासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

पुण्यातील  खडकवासला धरणातून रात्री २५ हजार क्यूसेकने पाणी सोडल्यानंतर शहरातील डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला होता. सकाळपासून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे मात्र नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाहून आलेल्या जलपर्णीमुळे मोठा कचरा निर्माण झालाय, सध्या भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे.

Exit mobile version