संदेशखाली हिंसाचार:टीएमसी नेते शिबू हाजरांना ८ दिवसांची पोलिस कोठडी!

न्यायालयात आणले असता 'चोर-बलात्कारी'च्या घोषणा

संदेशखाली हिंसाचार:टीएमसी नेते शिबू हाजरांना ८ दिवसांची पोलिस कोठडी!

पश्चिम बंगालमध्ये बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या तृणमूल काँग्रेसचा नेता शिबू हाजरा याला रविवारी बसीरहाट उपविभागीय न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने शिबू हाजरा याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी शिबू हाजरा यांना रविवारी बसीरहाट उपविभाग न्यायालयाच्या आवारात आणले असता उपस्थित असलेल्या लोकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. यावेळी महिलांनी ‘चोर-चोर’ आणि ‘बलात्कारी-बलात्कारी’ अशा घोषणा दिल्या.घोषणा देणाऱ्यांमध्ये बहुतांश लोक संदेशखळी येथील होते.

शिबू हाजरा यांच्या अटकेनंतर संदेशखाली येथे रविवारी सकाळपासूनच जल्लोषाचे वातावरण होते. यावेळी स्थानिक महिला एकमेकांना मिठाई वाटताना दिसल्या.शिबू हाजरा यांची अटक ही अर्धा रस्ता पार करण्यात आल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. हाजरा याचा राजकीय गुरु, ईडी आणि सीएपीएफ जवानांवर ५ जानेवारीच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि फरार असलेला तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान याच्या अटकेनंतर खरोखरच संदेशखालीमध्ये खरी शांतता प्रस्थापित होईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

छत्तीसगड: सशस्त्र दलाच्या जवानाची नक्षलवाद्यांकडून हत्या!

राजस्थानमध्ये हिजाबवरून पुन्हा वातावरण तापले!

काका पुतण्याचे संबंध कसे असावेत? रितेश देशमुखांनी सांगितली आठवण

नव्या जोशात काम करा, पुढचे १०० दिवस महत्त्वाचे!

एका स्थानिक महिलेने सांगितले की, आम्ही मिठाई देऊन आनंद साजरा करत आहोत. ज्या दिवशी शेख शहाजहानला अटक करण्यात येईल, त्या दिवशी आम्ही सहलीचे आयोजन करण्यात येईल.दरम्यान, घटनेनंतर शाहजहान फरार आहे. मात्र, भूमिगत राहून तो अटकपूर्व जामिनासाठी आपल्या वकिलामार्फत विविध न्यायालयांमध्ये धाव घेत आहे.

Exit mobile version