संदेशखाली अत्याचार प्रकरण; तृणमूल नेत्याला अखेर अटक!

सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल

संदेशखाली अत्याचार प्रकरण; तृणमूल नेत्याला अखेर अटक!

संदेशखालीतील महिलेवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसचे नेते शिबाप्रसाद हझरा उर्फ शिबू हझरा यांना अटक केली. याच दिवशी पोलिसांनी तृणमूलनेते शिबाप्रसाद हजरा आणि उत्तम सरदार यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

संदेशखालीतील महिलेने काही दिवसांपूर्वी आपल्यावरील लैंगिक अत्याचाराला लेखी तक्रारीतून वाचा फोडल्यानंतर या दोघा तृणमूल नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नुकतेच पक्षातून निलंबित केलेल्या शेख शहाजहान यांचे हे निकटवर्तीय मानले जातात. या महिलांच्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

मात्र ,न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तक्रारदार महिलेचे म्हणणे नोंदवून घेतल्यानंतर या महिलेने तिचा विनयभंग नव्हे तर, सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर न्यायालयाने तृणमूलच्या नेत्यांवर या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे निर्दश पोलिसांना दिले होते. सरदार यांना गेल्या आठवड्यात तृणमूल काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित केल्यावर त्याला अटक करण्यात आली होती.

संदेशखालीतील बहुतेक सर्व नागरिकांशी याबाबत संवाद साधण्यात आला असून महिला पोलिसांचे विशेष पथकही स्थापन करण्यात आल्याचे पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालक राजीव कुमार यांनी सांगितले. ‘कोणत्याही व्यक्तीविरोधात काहीही आरोप असतील, मग ते पोलिस का असेनात, त्या सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,’ असे आश्वासन राजीव कुमार यांनी दिले. ६ फेब्रुवारीपर्यंत याबाबत कोणतीही तक्रार नव्हती आणि आताही केवळ एकाच महिलेने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तक्रार दिली आहे.

हे ही वाचा:

बारामतीत रंगणार पैठणीचा खेळ

देशभरातील न्यायालयांत ४.४७ कोटी खटले प्रलंबित

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या दर्शनाची नवी व्यवस्था

भारताची ‘यशस्वी’ घौडदौड; तिसऱ्या दिवसाअंती ३२२ धावांची आघाडी

आणखी तक्रारी आलेल्या नाहीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी शेख शहाजहानवर गुन्हा दाखल केला होता. मात्र न्यायालयाच्या आदेशाने याचा तपास थांबल्याचे आयुक्तांनी सांगितले.सध्या या भागात संचारबंदी लागू आहे. मात्र काही दिवसांतच परिस्थितीत सुधारणा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. काही भागांच्या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर तिथून संचारबंदी हटवायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ईडीचे अधिकारी तृणमूल नेते शेख शहाजहान याच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. तर, स्वतः शेख त्या दिवसापासून फरार होता. मात्र त्यांच्या गैरहजेरीत अनेक महिलांनी पुढे येऊन त्यांच्यावर तृणमूल नेत्यांकडून अनेकदा लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलांना तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात नेल जात असे, तिथे त्यांच्यावर अनेक दिवस अत्याचार होत असत. कार्यकर्त्यांचे समाधान झाल्यानंतर त्यांची सुटका होत असे, असा आरोप या महिलांनी केला आहे.

Exit mobile version