शहाजहान शेखला कोर्टाचा धक्का, १० दिवसांची पोलिस कोठडी!

न्यायालयाने शाहजहान शेखचा जामीन अर्ज फेटाळला

शहाजहान शेखला कोर्टाचा धक्का, १० दिवसांची पोलिस कोठडी!

संदेशखाली प्रकरणातील मुख्य आरोपी शाहजहान शेखला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी अटक केल्यानंतर टीएमसी नेता शाहजहान शेख यांना बशीरहाट न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयाने शहाजहान शेखला १० दिवसांची पोलिस कोठडी दिली.तसेच न्यायालयाने शाहजहान शेखचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांचा लैंगिक छळ आणि जमीन हडप केल्याचा आरोप असलेला तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला तब्बल ५५ दिवसांनी गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली.पोलिसांनी सांगितले की, उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखालीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या मिनाखान येथील घरातून शाहजहान शेखला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

तृणमूलचा नेता शेख शहाजहान याला अखेर अटक

जामतारामध्ये भीषण अपघात; १२ प्रवाशांना रेल्वेने चिरडले

पवार कृषिमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांपर्यंत पॅकेज पोहोचण्याआधी लुटले जायचे!

‘कलम ३७०’ने ५० कोटींचा टप्पा ओलांडला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसी नेता शाहजहान शेख काही साथीदारांसह मिनाखान येथील घरात लपला होता. अटकेनंतर त्याला बशीरहाट न्यायालयात नेण्यात आले.पोलिसांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र, न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले होते की, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालय (ईडी) किंवा पश्चिम बंगाल पोलीस शेखला अटक करू शकतात.यानंतर २४ तासातच तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला ताब्यात घेतले.

 

Exit mobile version