नाशिक शहर पोलीस आयुक्तांची उचलबांगडी; संदीप कर्णिक नवे पोलीस आयुक्त

नाशिक शहर पोलीस आयुक्तांची उचलबांगडी; संदीप कर्णिक नवे पोलीस आयुक्त

वाढती गुन्हेगारी आणि ललित पाटील ड्रग्स प्रकरणात चर्चेत आलेल्या नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. शिंदे यांची राज्य गुप्त वार्ता विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली असून नाशिक शहर पोलीस आयुक्तपदी पुण्याचे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणामुळे नाशिक शहर मागील दोन महिन्यापासून चर्चेत आले होते. पुणे आणि मुंबई पोलिसांनी नाशिक येथे केलेल्या ड्रग्सच्या कारवाईमुळे पोलीस आयुक्ताच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यात नाशिक मधील वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस आयुक्ताना अंकुश लावता आला नसल्याचा ठपका ठेवत नाशिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची कालावधी पूर्ण होण्यापूर्वी बदली करण्यात आली. शिंदे यांना राज्य गुप्त वार्ता विशेष पोलीस महानिरीक्षकपदी त्यांची बदली करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

ईडीचा काँग्रेसला दणका; संबंधित कंपन्यांची ७५१ कोटींची मालमत्ता जप्त

३ वर्षांच्या मुलाचे अपहरण, कॉलेज विद्यार्थीनीसह तिघे जेरबंद

धनगर आंदोलकांनी जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालय, गाडी फोडली

गुजरात राज्याचा राज्य मासा म्हणून ‘घोळ’ माशाची निवड!

पुण्याचे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप कर्णिक हे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक असताना संदीप मावळ गोळीबार प्रकरणात ते वादात अडकले होते. मावळ येथे ९ ऑगस्ट २०११रोजी शेतकऱ्यावर पोलिसानी केलेल्या गोळीबारात त्यात तीन शेतकरी ठार झाले होते.
गोळीबाराचा आदेश तत्कालीन पोलीस अधिकक्ष संदीप कर्णिक यांनी दिला होता असा आरोप कर्णिक यांच्यावर होता.

Exit mobile version