सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर समाधान व्यक्त करत सनातन संस्थेचा या सगळ्या प्रकरणात कोणताही सहभाग नव्हता हे सिद्ध झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
राजहंस यांनी म्हटले आहे की, सनातन संस्था ही निर्दोष होती हे सिद्ध झाले. सनातन संस्थेची बदनामी करण्याचा अर्बन नक्षल्यांचा जो डाव होता, तो यानिमित्ताने उघड झाला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या हत्येनंतर असा दावा केला होता की, दाभोलकरांच्या हत्येत हिंदुत्ववादी संघटनेचा समावेश होता. त्यामुळे सरकारने हिंदुत्ववादी संघटनांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
पुणे सत्र न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा ज्यांच्यावर ठपका होता त्या वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे म्हणजे वोट जिहादचे ‘आका’
बीसीसीआय लवकरच नव्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू करणार
‘नक्षलवाद्यांनी जमिनीत पुरलेले २० किलो आयडी जागीच निष्प्रभ’
दाभोलकर हत्येच्या निकालातून काय समोर येणार?
राजहंस म्हणाले की, हिंदुत्ववादी संघटनांचा या हत्येत सहभाग आहे असा दावा करण्यात आल्यानंतर निर्दोष सोडलेल्या तिघांना अटक करण्यात आली. विक्रम भावे यांना दोन वर्षे तुरुंगात काढावी लागली. सनातन आश्रमात रुग्णांना मोफत उपचार देणाऱ्या डॉ. वीरेंद्र तावडे यांनाही निष्कारण अटक केली गेली होती. ते तर तब्बल ८ वर्षे तुरुंगात होते. ऍड. संजीव पुनाळेकर यांना ४२ दिवस तुरुंगात ठेवले गेले. केवळ सनातन संस्थेचे सदस्य म्हणून त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले. पण आजच्या या निर्णयामुळे सनातन संस्थेचा विजय झाला आहे.
राजहंस म्हणाले की, कळसकर आणि अंदुरे यांना जी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे त्यासंदर्भात वरच्या कोर्टात अपील केले जाईल.
याआधी शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयाने कळसकर, अंदुरे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर तिघांना निर्दोष सोडले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पीपी जाधव यांनी हा निकाल ऐकविला. त्यानुसार कळसकर, अंदुरे यांना जन्मठेप आणि ५ लाखांचा दंड अशी शिक्षा सुनावली.