महाराष्ट्र लॉन टेनिस संघटनेच्या माध्यमातून आयोजित १०व्या राज्य महिला टेनिस स्पर्धेत समृद्धी प्रमोद खानविलकरने उपविजेतेपद पटकाविले. मीरा पटवर्धनविरुद्धच्या सामन्यात समृद्धीला १-६, ०-६ असा पराभव पत्करावा लागला. मीरा पटवर्धन या सामन्यात विजेती ठरली. पण प्रथमच राज्य स्पर्धेत खेळत असलेल्या समृद्धीने उपविजेतेपदापर्यंत झेप घेतली.
सोलापूर येथे ही स्पर्धा पार पडली. अंतिम फेरीनंतर मीरा आणि समृद्धी यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
हे ही वाचा:
कुनो पार्कमधील ‘गामिनी चित्त्या’ने दिला पाच शावकांना जन्म!
राजस्थानमध्ये काँग्रेसला खिंडार, माजी मंत्र्यांसह ३२ जणांचा भाजपात प्रवेश!
युसुफ पठाण तृणमूलमधून लढणार लोकसभा!
इयत्ता दुसरीतल्या मुलाला हृदयविकाराचा झटका?
महिला गटातील या स्पर्धेत समृद्धीने जिल्हा स्पर्धेतून प्रवेश मिळविला होता. मुंबईत एमएसएलटीएमध्ये ही जिल्हा स्पर्धा फेब्रुवारीत पार पडली होती. त्यात तिने दुसरे स्थान मिळविले होते. पहिल्या दोन खेळाडूंना राज्य स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे समृद्धीचे राज्य स्पर्धेत खेळणे निश्चित झाले.
समृद्धी गेली सात वर्षांपासून लॉन टेनिस खेळत आहे. राज्य स्पर्धेत खेळण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे. या कामगिरीमुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.