27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषबिहारच्या उपमुख्यमंत्रीपदी सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांची वर्णी

बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदी सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांची वर्णी

Google News Follow

Related

बिहारमध्ये आता तेथील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख सम्राट चौधरी आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

कोण आहेत सम्राट चौधरी..

२४ वर्षीय सम्राट चौधरी यांनी २७ मार्च २०२३ रोजी राज्य भाजप प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. सहा वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि बिहार विधान परिषदेतील भाजपचे विरोधी पक्ष नेतेपदही त्यांनी भूषविले आहे. चौधरी हे बिहारमधील एका प्रभावशाली राजकीय घराण्यातील आहेत. त्यांची ही नियुक्ती लव (कुर्मी) आणि कुश (कुशवाह) यांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला उपयुक्त ठरणार आहे. २०१४ मध्ये सम्राट यांनी राष्ट्रीय जनता दलात फुट पाडण्यात ते यशस्वी झाले आणि नंतर ते भारतीय जनता पक्षात सहभागी झाले होते. २०२२ मध्ये चौधरी यांची बिहार विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.

हेही वाचा..

एनआयएने फरार दहशतवाद्याचे लावले पोस्टर, ५ लाखांचे बक्षीसही जाहीर!

आमच्यावरील तो आरोपांचा हल्ला आणि आमचा प्रतिकार केसस्टडी बनेल!

‘अयोध्येचा पुरातत्त्व अहवाल सार्वजनिक करा’

इराणमध्ये घरात घुसून पाकिस्तानच्या नऊ नागरिकांची हत्या

कोण आहेत विजय सिंन्हा..

५५ वर्षीय विजय सिन्हा २००५ पासून लखीसराय मतदारसंघातून बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. ते २५ नोव्हेंबर २०२० ते २४ ऑगस्ट २०२२ पर्यंत बिहार विधानसभेचे अध्यक्ष होते. सत्ताधारी महायुतीने त्यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावानंतर सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

बिहारचे राजकारण..

आदल्या दिवशी वेगवान राजकीय घडामोडींना पूर्णविराम देत जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना भाजप आमदारांच्या समर्थन पत्रांसह राजीनामा पत्र सुपूर्द केले. राजीनाम्याचे पत्र स्वीकारून राज्यपालांनी नितीश कुमार यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रशासकीय कर्तव्ये पार पाडण्याची विनंती केली. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह नितीश कुमार यांनी आज सायंकाळी नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा