असामान्य कार्य करणाऱ्या सर्वसामान्य स्वयंसेवकांचा चित्रगौरव

असामान्य कार्य करणाऱ्या सर्वसामान्य स्वयंसेवकांचा चित्रगौरव

कोविडच्या या महामारीमध्ये अनेक सामान्य माणसांनी असामान्य कार्य करून दाखवले. हे कार्य होते कोरोना योध्यांचे. अनेक स्वयंसेवी संघटनांनी या कार्यात स्वतःला झोकून दिले होते. यातच होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समिती. संघाच्या याच कार्याची दखल घेत त्यांच्या या कार्यावर एक लघुपट बनवण्यात आला आहे. ‘समिधा’ असे या लघुपटाचे नाव असून प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे.

कोविडच्या पहिल्या लाटेपासूनच जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःला सेवाकार्यात झोकून दिले होते. देशभर कुठेही संकट कोसळले की मदतकार्यासाठी संघ कायमच अग्रेसर असतो. पण कोविडचे संकट हे वेगळ्या स्वरूपाचे होते. पण तरीही संघाचे स्वयंसेवक हे मागे हटले नाहीत. कोविड सेंटर उभारणे, ठिकठिकाणी जाऊन चाचण्या करणे, फूड पॅकेट वाटप, रक्तदान, कोविड महामारीत जीव गमावलेल्यांवर अंत्यसंस्कार अशी अनेक प्रकारची कामे संघ स्वयंसेवकांनी देशभर केली. याच सर्व कार्यावर बेतलेला ‘समिधा’ हा लघुपट आहे.

हे ही वाचा:

‘टीका वाली नाव’…बिहारमधले अनोखे लसीकरण केंद्र

प्राण्यांचा छळ करणाऱ्या भाई जगतापांवर गुन्हा दाखल करा

बैलगाडीलाही पेलवेना काँग्रेसचा भार

उत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण विधेयक?

‘समिधा’ लघुपट हा शुक्रवार ९ जुलै रोजी प्रदर्शित झाला. युट्यूबवर ‘राजश्री मराठी’ च्या अकाऊंटवरून हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता आस्ताद काळे ह्याने या लघुपटात मुख्य भूमिका बजावली आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेचा पुण्याला चांगलाच फटका बसला. अशा वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनकल्याण समिती यांनी कशाप्रकारे कार्य केले याची एक छोटीशी झलक दाखवण्याचा प्रयत्न या ३२ मिनिटांच्या लघुपटातून करण्यात आला आहे. चिन्मय मांडलेकर आणि दिग्पाल लांजेकर यांनी या लघुपटाची निर्मिती केली असून दिगपाल लांजेकर यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा लघुपट म्हणजे देशभरातील लाखो स्वयंसेवकांचा केलेला चित्ररूपी सन्मान आहे.

Exit mobile version